AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ISIS terrorist | तपास संस्थेला मोठे यश, पुणे येथील इसिस मॉड्यूल प्रकरणातील दहशतवाद्यास अटक

Nia pune isis module terrorist | पुणे शहरातून इसिस मॉड्यूल प्रकरणातील फरार दहशतवाद्यास पकडण्यास दिल्ली पोलिसांना यश आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या या दहशतवाद्यावर एनआयएने लाखोंचे बक्षीस जाहीर केले होते.

ISIS terrorist | तपास संस्थेला मोठे यश, पुणे येथील इसिस मॉड्यूल प्रकरणातील दहशतवाद्यास अटक
शाहनवाज
Follow us
| Updated on: Oct 02, 2023 | 10:46 AM

पुणे, नवी दिल्ली | 2 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरात इसिस मॉड्यूल प्रकरणात सक्रीय असणारे दहशतवादी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) पुणे पोलिसांच्या रडारवर होते. या दहशतवाद्यांचा शोध गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होता. पुणे पोलिसांनी 18 जुलै रोजी दोन दशतवाद्यांना पकडले होते. त्यानंतर इसिस मॉड्यूलचा खुलासा तपास संस्थांना झाला होता. यामुळे पुणे एटीएसकडून राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) हे प्रकरण देण्यात आले. एनआयएने दहशतवाद्यांचा मुसक्या आवरण्यासाठी जोरदार कारवाई सुरु केली होती. अखेरी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले आहे.

कोणाला केली अटक

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इसिस मॉड्यूल प्रकरणात एका दहशतवाद्यास अटक केली आहे. या दहशतवाद्याचे नाव शाहनवाज असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयएने या दहशतवाद्यावर तीन लाखांचे बक्षीस ठेवले होते. तसेच एनआयएच्या मोस्ट वॉटेंड दहशतवाद्याच्या यादीत तो होता. याला शाहनवाज उर्फ शैफी उज्जमा नावाने ओळखले जात होते. या दहशतवाद्यांनी आईईडी बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. तसेच इतर जणांना प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा घेतली होती. स्फोटाची चाचणी त्यांनी साताऱ्यातील जंगलात केली होती.

शाहनवाज होता इंजीनिअर

दिल्ली पोलिसांनी शाहनवाज याच्या अटकेला दुजोरा दिला आहे. शाहनवाज हा इंजीनिअर होता. पुणे पोलिसांच्या कस्टीडीतून तो फरार झाला होता. तो दिल्लीत राहत होता. त्याची एनआयए आणि दिल्ली पोलीस कसून चौकशी करत आहे. एनआयए आणि पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. तीन दहशतवादी फरार झाले होते. ते दिल्लीत लपलेले होते. त्यात शाहनवाज उर्फ शैफी उज्जमा होता.

हे सुद्धा वाचा

दोघांच्या तपासासाठी सर्च ऑपरेशन

एनआयएने दिल्ली पोलिसांना इसिसचे तीन दहशतवादी लपल्याची माहिती दिली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली. पोलिसांनी सोमवारी शाहनवाज याला पकडले. आता या प्रकरणातील दोघे फरार दहशतवादी रिजवान अब्दुल हाजी अली आणि अब्दुल्लाह फयाज शेख यांचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.