AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News : पुणे शहरातील बेपत्ता आयटी अभियंता तरुणाचा खून, काय असणार कारण?

Pune Criem News : पुणे शहरातील एमपीएससी पास दर्शना पवार हिच्या खुनाचे रहस्य उलगडले असताना आणखी एका तरुणाचा खून झाला आहे. पुणे शहरात सॉफ्टवेअर कंपनीत अभियंता असणाऱ्या तरुणाचा मृतदेह सापडलाय.

Pune News : पुणे शहरातील बेपत्ता आयटी अभियंता तरुणाचा खून, काय असणार कारण?
Saurabh Nandlal Patil
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 7:57 AM

पुणे | 8 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात नुकतेच एसपीएससी पास तरुणी दर्शना पवार हिच्या खुनाचे प्रकरण घडले होते. त्यानंतर आता आयटी अभियंत्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या आठ, दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा कुजलेला अवस्थेत मृतदेह सापडला आहे. हा तरुण बेपत्ता असल्याची नोंद यापूर्वीच पोलिसांत करण्यात आली होती. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील हा तरुण आहे. तो पुण्यात सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत होता.

कुठे मिळाला मृतदेह

हिंजवंडी येथील सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत असलेला सौरभ नंदलाल पाटील ( वय 23) हा 28 जुलैपासून बेपत्ता होता. त्याचे नातेवाईक संदीप सोनावणे यांनी याबाबत मिसिंगची तक्रार हिंजवडी पोलिसात नोंदवली होती. मात्र त्याचा मृतदेह खेड घाटात कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बिरुदेव काबुगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी सापडली अन्

सौरभ पाटील बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध सुरु केला. मात्र तो सापडला नाही. यामुळे हिंजवडी पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी तपास सुरु केल्यावर त्याची दुचाकी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या होलेवाडी येथे सापडली. त्या गाडीची चावी जवळ असलेल्या विहिरीवर मिळाली. परंतु त्यांचा शोध लागला नाही. शेवटी सांडभोरवाडी जवळ असलेल्या जुन्या खेड घाटात एका शेतात त्याचा मृतदेह वाढला. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर सौरभचा खून झाल्याचे स्पष्ट झाले.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी चौकशीसाठी तयार केली पथके

दरम्यान सौरभ पाटील याच्या खुनाच्या प्रकरणानंतर खेड पोलिसांनी तपासासाठी पथक तयार केला आहे. त्याच्या संशयास्पद मृत्यूबाबत चौकशी सुरु करण्यात आली. पुणे पोलिसांनी नुकतेच दर्शना पवार हिच्या खुनाचे रहस्य उलगडले होते. तिचा खून मित्रानेच केल्याचे तपासातून समोर आले होते. या प्रकरणात आरोपीला अटक झाली होती. आता सौरभ पाटील याच्या खुनाचे रहस्य उलगडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....