Pune news : पुणे सुसाट, सहा महिन्यांत फ्लॅटची विक्री झाली दुप्पट, काय आहेत कारण?

Pune News : पुणे शहरात घर असावे, असे स्वप्न अनेकांचे असते. आता पुणे शहरात बाहेरुन येणाऱ्या अनेक जण गुंतवणूक करत आहे. गेल्या सहा महिन्यात पुणे शहरातील फ्लॅटची विक्री दुप्पट झाल्याची माहिती समोर आली आहे. महारेराच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

Pune news : पुणे सुसाट, सहा महिन्यांत फ्लॅटची विक्री झाली दुप्पट, काय आहेत कारण?
real estate projet in puneImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 8:13 AM

पुणे | 13 ऑगस्ट 2023 : पुणे शहराचा विकास गेल्या काही वर्षांपासून वेगाने होत आहे. पुणे शहरात आधी मोठ, मोठे उद्योग उभारले गेले. त्यामुळे नोकरीसाठी अनेक जण पुण्यात आले. आता गेल्या चार, पाच वर्षांपासून महिती अन् तंत्रज्ञान क्षेत्राचे हब पुणे शहर झाले आहे. यामुळे पुण्यात देशभरातील आयटीमधील इंजिनिअर येत आहेत. पुणे शहरातील उपनगरमध्ये अनेक बिल्डरांनी आपले प्रकल्प उभे केले आहेत. आता गेल्या सहा महिन्यांत पुणे शहरातील फ्लॅट विक्री दुप्पट झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

किती विक्री वाढली

गेल्या दोन वर्षांपासून गृहकर्जाचे व्याजदर वाढत आहेत. परंतु पुणे शहरात फ्लॅट घेण्याऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. गेल्या सहा महिन्यांत त्यात चांगलीच वाढ झाली आहे. महारेराकडील आकडेवारीनुसार 2023 च्या सहा महिन्यात पुणे जिल्ह्यात 11 हजार 1 BHK फ्लॅटची विक्री झाली आहे. 2022 च्या दुसऱ्या सहामाहीत 6,365 फ्लॅटची विक्री झाली होती. 2023 च्या पहिल्या सहा महिन्यांतच 60,000 फ्लॅट तयार झाले. 2022 मधील संपूर्ण वर्षभराची आकडेवारी 70,000 होती.

का वाढली विक्री

पुणे शहरात फ्लॅट घेणारे 70 टक्के लोक आयटी सेक्टरमधील आहे. वर्क फ्रॉर्म होम कल्चरमुळे पुण्यात फ्लॅट घेण्यास प्राधान्य दिले जात आहेत. तसेच 1 BHK फ्लॅट परवाडणाऱ्या किमतीत मिळत असल्यामुळे ते खरेदी करण्याकडे कल आहे.

हे सुद्धा वाचा

किती फ्लॅट झाले तयार

पुणे शहरात 2023 च्या पहिल्या आठवड्यात 11,648 1 BHK फ्लॅट तयार झाले. 25,479 फ्लॅट 1.5 बीएचके तर 11,529 फ्लॅट 2.5 आणि 3 BHK आहेत. टक्केवारीनुसार 19 टक्के 1 BHK, 42 टक्के 1.5 तर 2 BHK 19 टक्के फ्लॅट होते.

कोणत्या भागांत मागणी

पुणे शहरातील वाकड, हिंजेवाडी, ताथेवाडी या भागांत घरांना अधिक मागणी आहे. यामुळे या ठिकाणी अधिक प्रकल्प सुरु झाली आहे. त्याचवेळी हडपसर-हिंजेवाडी, केशवनगर-मुंढवा आणि धायरी यासारख्या भागात कमी प्रकल्प सुरु झाले. मागणी जास्त अन् प्रकल्प कमी असल्यामुळे या भागात किमती वाढण्याची शक्यता रिअल इस्टेटमधील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.