“कांद्यावरील निर्यात बंदी उठवा”, सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर
जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे कांदा प्रश्नी शेतकरी आक्रमक झालेत. शेतकऱ्यांनी जन आक्रोश आंदोलन छेडलं आहे.

पुणे : जुन्नर (Junnar) तालुक्यातील ओतूर येथे कांदा प्रश्नी शेतकरी आक्रमक झालेत. शेतकऱ्यांनी जन आक्रोश आंदोलन (Janakrosh Andolan) छेडलं आहे. कल्याण नगर महामार्गांवर रास्ता रोको करण्यात येत आहे. सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कांद्यावरील निर्यात बंदी उठवून निर्यात करात सवलत द्यावी, यासाठी जनआक्रोश आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शेतकरी संघटनांनी जुन्नर तालुक्यात हे आंदोलन सुरू केलं आहे. 200 पेक्षा जास्त ट्रॅक्टर या रॅलीत सहभागी झालेत. या आंदोलनात थोड्याच वेळात माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके उपस्थित राहणार आहेत.