लोकसभा निवडणुकीत ‘शिवसंग्राम’ची भूमिका काय?; ज्योती मेटे यांनी स्पष्टपणे सांगितलं
Jyoti Mete Press Conference About Loksabha Election 2024 : लोकसभा मिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम संघटनेची भूमिका काय? कुणाला पाठिंबा देणार? याबाबत ज्योती मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी निवडणुकीतील भूमिकेवर स्पष्ट मत मांडलं. वाचा सविस्तर...
देशात लोकसभेची निवडणूक होतेय. या निवडणुकीत शिवसंग्राम संघटनेची भूमिका काय असेल याची चर्चा होतेय. पुण्यात शिवसंग्राम संघटनेच्या बैठकी पार पडली. ज्योती मेटे यांनी शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यभरातून सर्व पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. शिवसंग्राम संघटनेचा नेमका पाठिंबा कुणाला महायुती की महाविकास आघाडी? याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीनंतर दिवंगत नेते, विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे पत्रकार परिषद घेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली आहे. सर्वां पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. सर्वांचं मत जाणून घेतलं आहे. यानंतर शिवसंग्राम संघटना लोकसभा निवडणुकित तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्योती मेटे काय म्हणाल्या?
बीड साठी थांबलो होतो. पण आता लोकसभा निवडणुकीत थांबू… नंतर बैठक घेऊन 12 जागा विधानसभेच्या लढू. आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. नाराजीचा प्रश्न नाही. योग्य वेळी योग्य निर्णय झाला आहे. बीड लोकसभा मी लढवावी, अशी जनतेची इचछा होती. म्हणून मी लढणार होते. मी याआधी तपशीलवार बोलले आहे. सगळी तपासणी केल्याननंतरच मी माघार घेतली होती. कोणत्याही राजकीय पक्षाला आम्ही लोकसभा निवडणुकीत मदत करणार नाही, हाच याचा अर्थ आहे, असं ज्योती मेटे म्हणाल्या.
बीड लोकसभा निवडणूक लढण्यासाठी ज्योती मेटे या आग्रही होत्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढण्याबाबत चर्चा झाली. त्यांची शरद पवार यांच्यासोबत याबाबत बैठकही झाली. मात्र शरद पवार गटाच्या नव्हे तर शिवसंग्रामच्या चिन्हावर निवडणूक लढण्यावर त्या ठाम होत्या. पण यावर एकमत होऊ शकलं नाही. त्यामुळे ज्योती मेटे यांची पुढची भूमिका काय असेल? याची चर्चा होत होती. आता त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.
तानाजी शिंदे म्हणाले…
शिवसंग्राम संघटनेच्या भूमिकेवर शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी भाष्य केलं. आम्ही महायुतीमध्ये होतो, हा भुतकाळ आहे. का लढणार नाही याचं कारण सांगायची गरज नाही. नाराजीचा प्रश्न नाही. सगळ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. आम्ही मतदान करणार पण पक्षाला पाठिंबा देणार नाही, असं तानाजी शिंदे म्हणालेत.