पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठी अपडेट; आता ‘या’ गोष्टींची होणार चौकशी

Pune Kalyaninagar accident case Big update Hit and run : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग आता या या प्रकरणी कारवाई करणार आहे. या प्रकरणातील दोन्ही बारवर कारवाई करण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर...

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोठी अपडेट; आता 'या' गोष्टींची होणार चौकशी
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 4:36 PM

पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आता राज्य उत्पादन शुल्क या प्रकरणी कारवाई करण्याची आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग दोन्ही पबवर कारवाई करण्याची शक्यता आहे. कोझी आणि ब्लॅक हे दोन्ही पब राज्य उत्पादन विभागाकडून करण्यात सील येणार असल्याची माहिती आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. नियमबाह्य मद्य विक्री केल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाग करणार दोन्ही पब सील केले जाणार आहेत.

पुण्यात भीषण अपघात

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री भीषण अपघात झाला. भरधाव वेगात पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या अनिस दुधिया आणि अश्विनी कोस्टा याचा मृत्यू झाला. हे प्रकरण सध्या प्रचंड चर्चेत आहे.  कल्याणीनगर अपघात प्रकरणात आता विशाल अग्रवालला पुणे पोलीस कोर्टात उद्या हजर केलं जाणार आहे. आज संध्याकाळी पाच वाजता त्याला पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी आणण्यात येणार आहे. आज सकाळी संभाजीनगरमधून विशाल अगरवाल याला करण्यात अटक आली होती.

कल्याणीनगर अपघात प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलिस आयुक्तांना फोन केला. या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातलं जाऊ नये. राजकीय दबावाला बळी न पडता कायद्याने कठोर कारवाई करावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशापाठोपाठ आता मुख्यमंत्र्यांचीही कडक भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिस आयुक्त फोनवर संवाद साधला. ड्रन्क अँड ड्राईव्ह केसमध्ये राजकीय हस्तक्षेप न करता, योग्य कायदेशीर निर्णय घ्यावा, असे आदेश अजित पवार यांनी पुणे पोलिस आयुक्तांना दिलेत.

पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे फोन आले आहेत. त्यांनी तपासाबाबात सुचना केल्या आहेत. दोषींवर कडक कारवाईच्या सुचना दिल्या आहेत. ⁠ब्लड रिपोर्ट लवकरात लवकर येईल. पबचे मालक आणि व्यवस्थापक या अटक करण्यात आलेल्या तिघांना आज कोर्टात हजर करणार आहेत. मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांना उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. ⁠दुसऱ्या गुन्ह्यातील चौथ्या आरोपीला जयेश बोनकर याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला ही उद्या कोर्टात हजर करणार आहेत, असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.