पुणे बस अपघातानंतर प्रशासन अलर्ट मोडवर, चौकशी समिती केली तयार

pune bangalore highway bus accident : मुंबई-पुणे महामार्गावरील अपघाताला दोन दिवस होत नाही तोपर्यंत पुन्हा एक गंभीर अपघात झाला आहे. खासगी बसच्या झालेल्या या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. आता या प्रकरणी समिती स्थापन केलीय.

पुणे बस अपघातानंतर प्रशासन अलर्ट मोडवर, चौकशी समिती केली तयार
road accidentImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 2:28 PM

योगेश बोरसे, पुणे : कोल्हापूरवरुन मुंबईला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बसला मध्यरात्री पुणे शहरातली कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. अपघातातील मृत्यू झालेल्या चौघांचे मृतदेहही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आता प्रशासनानेही पावले उचलली आहे. या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली आहे. समितीच्या अहवालानंतर उपाययोजना करण्यात येणार आहे.

कसा झाला होता अपघात

कोल्हापूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा आणि मालवाहू ट्रकचा भीषण रात्री 2:15 च्या सुमारास झाला. मध्यरात्री सर्व प्रवासी गाढ झोपेत असतानाच पुणे-बेंगलोर महामार्गावरील जांभूळवाडी भागात हा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. कात्रज बोगद्याजवळ झालेल्या या अपघातानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. अपघातासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला अहवाल देण्याचे आदेश दिले आहे.

हे सुद्धा वाचा

कोण आहे समितीत

खासगी ट्रॅव्हल बस कोल्हापूरवरुन डोंबिवलीला जात होती. नीता ट्रॅव्हल्सची ही बस होती. तर मालवाहतूक करणारा ट्रक कोल्हापूरवरुन अंबरनाथकडे जात होता. भरधाव असलेल्या मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक थेट खासगी ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळली. आता या प्रकरणी समिती स्थापन केली आहे. या समितीत पुणे परिवहन आयुक्त, बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग आणि वाहतूक शाखेचे अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

चौघांमध्ये दोन पुरुष, दोन महिला

अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. अपघातातील जखमी आणि मृत प्रवासी मुंबईचे होते की कोल्हापूरचे हे स्पष्ट झाले नाही. परंतु यानिमित्ताने पुन्हा एकदा खासगी ट्रॅव्हल्सच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता समिती काय अहवाल देणार? याकडेही लक्ष लागले आहे.

अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. मात्र रात्रीचा अंधार असल्याने मदतकार्यात अडथळा येत होता.

हे ही वाचा

Video : तापमान वाढले अन् मुंबईतील AC लोकलची अशी कशी झाली अवस्था

Video | उन्हामुळे हैराण झालेल्या युवकाची भन्नाट आयडीया झाली व्हायरल

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.