पुणे होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये गोलमाल? महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय
Pune unauthorized hoardings : पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज कोसळण्याच्या घटना काही महिन्यांपूर्वी घडल्या होत्या. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा चर्चेत आला होता.
पुणे | 13 ऑगस्ट 2023 : अनधिकृत होर्डिंग्ज अनेक शहरात उभारले जातात. शहरांचा चेहरा खराब करण्याचे काम हे होर्डिंग करतात. परंतु धोकादायक पद्धतीने उभारलेल्या होर्डिंगने पुणे शहरात काही महिन्यांपूर्वी पाच जणांचा बळी घेतला होता. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडीमधील अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यानंतर पुणे महानगरपालिका प्रशासन खळवळून जागे झाले. त्यांनी अनधिकृत होर्डिंग्जवर करत स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. आता या ऑडिटमधील गोलमाल समोर आला आहे. यामुळे मनपाने मोठा निर्णय घेतला आहे.
काय झाला प्रकार
पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) शहरातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बहुसंख्य होर्डिंग कंपन्यांनी एकाच संस्थेने तयार केलेला ऑडिट अहवाल दिला. पुणे महानगरपालिकेला हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने पावले उचलली गेली. स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी पाच सदस्यांचे पॅनेल तयार करण्याचा निर्णय पुणे मनपाने घेतला आहे.
का घेतला हा निर्णय
मनपाकडे दाखल झालेल्या होर्डिंगच्या ऑडिटवरील विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाले आहे. ऑडिट अहवाल तयार करताना चुकीची पायंडा वापरला गेला असेल. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनपाकडे दाखल केलेल्या 50% पेक्षा जास्त स्ट्रक्चरल ऑडिट फक्त एकाच संस्थेद्वारे केले जातात. याशिवाय, स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या कंपन्यांची फारच कमी माहिती उपलब्ध आहे. यामुळे पाच जणांची समिती तयार करण्यात आली असून ते या ऑडिटचे ऑडिट करणार आहेत.
किती बेकायदेशीर होर्डिंग काढले
आता महानगरपालिकेकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. यासाठी पाच सदस्यीय पॅनेल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे आणि पिंपर चिंचवड शहरात एकूण 2,300 कायदेशीर होर्डिंग्ज आहेत. शहरात 1,000 हून अधिक बेकायदेशीर होर्डिंग्ज होते ते काढले गेले आहेत. परंतु यानंतर अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिग्ज आहेत, त्यावर अजून कारवाई झालेली नाही. परंतु आता मनपाने पाच जणांची समिती तयार केली असल्यामुळे हा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता व्यक्त केले जातात.