Sambhaji bhide : संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढणार? तुषार गांधी यांनी उचलले हे पाऊल

Sambhaji bhide and tushar gandhi : संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आता या प्रकरणात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनीही पाऊल उचलले आहे.

Sambhaji bhide : संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढणार? तुषार गांधी यांनी उचलले हे पाऊल
tushar gandhi and Sambhaji bhide
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 1:42 PM

योगेश बोरसे, पुणे | 10 ऑगस्ट 2023 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे संभाजी भिडे यांच्याविरोधात राज्यभरात वातावरण चांगलेच पेटले आहे. राज्यात ठिकठिकाणी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. अमरावतीत संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता संभाजी भिडे यांच्याविरोधात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुणे शहरात संभाजी भिंडे यांच्या विरोधात तक्रार दिली. यामुळे भिडे यांच्या अडचणी वाढणार आहेत.

तुषार गांधी पोलीस ठाण्यात

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी पुणे शहरातील डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यांनी संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल तक्रार दाखल केली. यावेळी त्यांच्यासोबत ऍड. असिम सरोदे ही होते. संभाजी भिंडे यांचा बोलविता धनी आरएसएस आणि नागपूर असल्याचा आरोप तुषार गांधी यांनी यावेळी केला. त्यांच्यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात एक आणि सभागृहाच्या बाहेर वेगळं बोलतात, असे त्याने म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

अटक करण्याची केली मागणी

तुषार गांधी म्हणाले की, संभाजी भिंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी आम्ही तक्रारीत केली आहे. संभाजी भिंडे यांनी आमच्या कुटुंबातील महिलांचा अपमान केला आहे. महात्मा गांधी आणि यांच्या आई आणि वडिलांवर त्यांनी टीका केली आहे. आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. संभाजी भिडेवर कारवाई होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

काय म्हणाले असिम सरोदे

तुषार गांधी, विश्वंभर चौधरी, कुमार सप्तर्षी, मेधा पुरव सामंत, अन्वर राजन, संकेत मुनोत, युवराज शहा यांनी संभाजी भिडे आणि कार्यक्रम आयोजन करणाऱ्यावर आयोजकांवर तक्रार दाखल केली आहे. कलम 499 अब्रू नुकसान करणे, अपमान करणे, स्त्रीत्वाचा अपमान करणे, कलम १५३ (अ) समाजामध्ये शत्रुत्व पसरवणे, कलम ५०५ गुन्हेगारी स्वरूपाचा खोडसाळपणा करणे, हे गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही केली असल्याचे असीम सरोदे यांनी म्हटले आहे. पोलिसांनी चौकशी करून आम्ही गुन्हा नोंद करू, असे सांगितल्याचे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय.
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना...
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना....
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी.
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.