पुण्यातील बैठकीचं निमंत्रण दोन तासआधी WhatsApp वर, राष्ट्रवादी शहराध्यक्षांवर महापौर मोहोळ बरसले

"राष्ट्रवादीच्या उथळ शहराध्यक्षांनी खोटं बोलून पुणेकरांची करत असलेली दिशाभूल थांबवावी ! राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रसिद्धीसाठी इतके पिपासू झाले आहेत, की गेल्या चार वर्षातील 'अडगळी'चा बॅकलॉग त्यांना लगेचच भरून काढायचा आहे." अशी टीका महापौरांनी केली

पुण्यातील बैठकीचं निमंत्रण दोन तासआधी WhatsApp वर, राष्ट्रवादी शहराध्यक्षांवर महापौर मोहोळ बरसले
Ajit Pawar Murlidhar Mohol
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 8:13 AM

पुणे : उपमुख्यमंत्री कार्यालयात पुण्यातील प्रश्नांबाबत आयोजित बैठकीला गैरहजेरीवरुन पुण्याचे महापौर, भाजप नेते मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. “राष्ट्रवादीच्या उथळ शहराध्यक्षांनी खोटं बोलून पुणेकरांची करत असलेली दिशाभूल थांबवावी” असं जोरदार प्रत्युत्तर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवरुन दिलं आहे. आमदार सुनील टिंगरे यांनी स्वतः फोन करुन महापौरांना बैठकीचं निमंत्रण दिलं होतं. मात्र, त्यांनी आपल्या घरी काकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, असा दावा राष्ट्रवादीने केला होता. (Pune Mayor Murlidhar Mohol answers NCP leader Prashant Jagtap allegations on meeting invitation)

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ काय म्हणतात?

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी सकाळी एकामागून एक 12 ट्विट करत आपल्यावरील आरोप खोडून काढले आहेत. “राष्ट्रवादीच्या उथळ शहराध्यक्षांनी खोटं बोलून पुणेकरांची करत असलेली दिशाभूल थांबवावी ! राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रसिद्धीसाठी इतके पिपासू झाले आहेत, की गेल्या चार वर्षातील ‘अडगळी’चा बॅकलॉग त्यांना लगेचच भरून काढायचा आहे. म्हणूनच वाट्टेल ते बोलायचं, चर्चेत येण्याचा प्रयत्न करताना लोकांची नेहमीप्रमाणे दिशाभूल करायची, ही त्यांची नेहमीची वृत्ती पुणेकरांनी चांगलीच ओळखली. म्हणूनच की काय 2017 साली ते महापौर असताना त्यांच्या पक्षाला पुणेकरांनी झिडकारुन लावले.” अशी टीका मोहोळ यांनी केली.

“बैठकीच्या दोन तास आधी व्हॉट्सअॅपवर पत्र”

“मूळ मुद्दा असा की, मंत्रालयात पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीला महापौर म्हणून महापौर कार्यालयाला निमंत्रण बैठकीआधी दोन तास WhatsApp वर मिळाले. शहराच्या महत्त्वाचा विषयावर नियोजित बैठक, प्रश्न सर्व महापालिकेशी निगडित आणि निमंत्रण कशावर… तर व्हॉट्सअॅपवर ! उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून 25 जूनला जे पत्र प्रसिद्ध करण्यात आलं त्यात महापौर म्हणून बैठकीला अपेक्षित आहेत, असा कुठेही उल्लेख नव्हता. याचाच अर्थ ‘महापौर’ म्हणून मला या बैठकीचे निमंत्रण नव्हते. दरम्यानच्या काळात प्रिंट मीडिया आणि बैठकीच्या दिवशी सकाळी ‘महापौरांना मंत्रालयातील बैठकीला डावललं’ अशा बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडियात झळकल्या. त्यानंतर लगेचच महापौर कार्यालयाला एक दिवस आधीच्या तारखेचे (28 जून) पत्र बैठकीच्या दोन तास आधी (29 जून, सकाळी 11 वाजता) पत्र व्हॉट्सअॅपवर मिळाले.” असा दावा मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.

महापौरांचे प्रश्न

“यावेळी मी मुठा या मुळशी तालुक्यातील गावी माझ्या आई-वडिलांसमवेत होतो. बैठकीला आपल्याला निमंत्रण नाही, याची खात्री झाल्यावरच मी मुठा गावाला जाण्याचे नियोजन केलं. ज्या ठिकाणाहून फोनवर बोलताना व्यवस्थित रेंज येत नाही. तिथून अचानकपणे ऑनलाईन सहभागी व्हायचं? बरं बैठकीचा अजेंडा काय? कोणकोणते विषय आहेत? त्या विषयाची सर्वांगीण आणि सद्यस्थितीची माहिती कधी आणि किती वेळात घ्यायची? बैठकीला कोणत्या विषयानुसार काय भूमिका असावी? याबाबत विचारायला करायला किमान वेळ तरी मिळू नये?” असा सवाल मोहोळ यांनी विचारला आहे.

“मुख्य मुद्दा, महापौर म्हणून राज्य सरकारच्या बैठकीला शहराच्या हिताचा विचार करुन गैरहजर राहिलेलो नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीपजी वळसे-पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा, ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब आणि मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या बैठकांना माझी उपस्थिती होती.” असंही महापौरांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

“पुणे शहरासाठी महत्वाची बैठक का टाळू?”

“पुण्यातील दर शुक्रवारी होणाऱ्या अजितदादांच्या सर्व बैठकांना हजेरी लावून समन्वय साधला आहे. असं असताना पुणे शहरासाठी महत्वाची असणारी बैठक आपण का टाळू? तरीही आपल्याला डावलून का होईना शहराच्या विकासासंदर्भात बैठक होतेय, याचं आपण स्वागतच केलं. पुणे शहरासाठी कोण झटतं? कोण काम करतं? संकटकाळात कोण घरात आणि कोण रस्त्यावर होतं? याची जाण पुणेकरांना नक्कीच आहे. विद्यमान शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखालील त्यांच्या पक्षाला पुणेकरांनी 2017 ला खड्यासारखं बाजूला केलं. त्यामुळे ही बनवेगिरी राष्ट्रवादी शहराध्यक्षांनी आता तरी थांबवावी, अन्यथा पुणेकर आपल्याला येत्या महापालिका निवडणुकीत तोंडी लावायलाही ठेवणार नाहीत.” असा घणाघातही महापौरांनी केला.

“मंत्रालय बैठक प्रकरणी महापौर खोटे बोलत आहेत, असा राष्ट्रवादी शहराध्यक्षांचा हास्यास्पद आरोप आहे. काळ सोकावू नये, म्हणून हा पुणेकरांशी ‘संवादप्रपंच’; कारण आमची बांधीलकी पुणेकरांशी आहे, ना की पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्यांशी” अशी टीपही महापौर मोहोळ यांनी दिली आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे ट्विट्स :

संबंधित बातम्या :

“उपमुख्यमंत्री कार्यालयातून निमंत्रण, पण महापौरांनी काकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं”, निमंत्रणाच्या वादावर राष्ट्रवादीकडून खुलासा

‘ही’ गोष्ट पुणेकर नेहमी लक्षात ठेवतील, महापौरांचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.