4 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याची तयारी सुरु, पुण्याच्या महापौरांची मोठी घोषणा
पुणे : राज्यात अनेक ठिकाणी आता शाळा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही ठिकाणी प्रायोगित तत्वावर शाळा सुरुही झाल्यात. आता कोरोनाचा मोठा फटका बसलेल्या पुण्यातही शाळा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी 4 जानेवारीला पुण्यात शाळा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. असं असलं तरी त्यांनी यासाठी पालकांचं हमीपत्र आवश्यक असल्याचं सांगितलं […]
पुणे : राज्यात अनेक ठिकाणी आता शाळा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही ठिकाणी प्रायोगित तत्वावर शाळा सुरुही झाल्यात. आता कोरोनाचा मोठा फटका बसलेल्या पुण्यातही शाळा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी 4 जानेवारीला पुण्यात शाळा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. असं असलं तरी त्यांनी यासाठी पालकांचं हमीपत्र आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. तसेच सध्या पालकांकडून हमीपत्र भरून देण्यास कमी प्रतिसाद असल्याचं सांगत पालकांची हमीपत्रं न आल्यास शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर फेरविचार केला जाईल असंही मोहळ यांनी नमूद केलं (Pune Mayor Murlidhar Mohol on Reopening of Schools amid Corona ). ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजप खासदार गिरीश बापट आणि भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीकही हजर होते.
मुरलीधर मोहळ म्हणाले, “आम्ही पुण्यात 4 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याची तयारी करतो आहे. पण पालकांकडून अद्याप हमीपत्र भरून द्यायला अत्यंत कमी प्रतिसाद आहे. पालकांची हमीपत्रं आली नाहीत, तर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचा पुन्हा फेरविचार करणार आहे.”
‘महाविकास आघाडी सरकारने अद्याप पुण्याला काहीच निधी दिला नाही’
गिरीश बापट म्हणाले, “केंद्र सरकारच्या अनेक योजना पुण्यात सुरु आहेत. मागील राज्य शासनाने महापालिकेला मोठा निधी दिला आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारने अद्याप पुण्याला काहीच निधी दिला नाही. आरपीआयसह 98 नगरसेवकांशी चर्चा करत आहोत. जी कामे केलीत ती लोकांपुढे गेली पाहिजेत. नगरसेवकांनी खूप कामे केली आहेत. विशेषतः सामाजिक काम खूप केले आहे. ही आमची बांधिलकी आहे.”
“कोरोनाचे संकट यशस्वीपणे हाताळले. प्रभागातील छोटी छोटी कामे व्हावीत अशी नागरिकांची मागणी असते. स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. कराच्या दंडात सवलत देऊन महापालिकेला उत्पन्न मिळवून द्यायचा प्रयत्न केला. स्थायी समिती अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी यासाठी सकारात्मक भूमिका पार पाडली. 24 तास पाणी पुरवठा योजनेला गती देण्यात आली आहे,” असंही गिरीश बापट यांनी सांगितलं.
“आरपीआय छोटा भाऊ आहे. त्यांना योग्य स्थान देत आलोय, यापुढेही देण्यात येईल. पुणेकरांना दिलेला शब्द आम्ही पाळणार आहोत. परंतु, यावेळी आधीपेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणू, असा मला विश्वास आहे,” असा विश्वासही बापट यांनी व्यक्त केला.
‘पुणे मनपात गावांचा नव्याने समावेश करण्यास विरोध नाही’
भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले, “भाजपचे सगळे नगरसेवक चांगले काम करत आहेत. पुढच्या वर्षी निवडणुकांची तयारी सुरू केलीय. कोणते प्रोजेक्ट राहिलेत, कसे पूर्ण करायचे याबाबत प्रत्येक नगरसेवकाशी वन टू वन चर्चा केली. गावांचा नव्याने समावेश करण्यास विरोध नाही. परंतु तेथील गावात सुविधा करण्यास राज्य शासनाने निधी दिला पाहिजे. आतापर्यंत ही गावं जिल्हा परिषदेत होती. तेथे कामे करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडले. हे अपयश झाकण्यासाठी गावे पालिकेत घेण्याचा घाट घातला आहे.”
हेही वाचा :
पुण्यात एअर होस्टेस तरुणीवर बलात्कार, Tinder अॅपवरून आरोपीसोबत ओळख झाली अन्….
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘बंगाल पॅटर्न’; भाजप नगरसेविकेचा पती राष्ट्रवादीत
2 रुपयांच्या निधीसाठी 36 वर्षांपासून लढा, पुण्यातील दर्ग्याच्या पाठपुराव्याची अनोखी कहाणी
Pune Mayor Murlidhar Mohol on Reopening of Schools amid Corona