Home Isolation ban : फ्लॅट, बंगल्यात राहणारे लोक कोव्हिड सेंटरला कसे येतील? पुण्याच्या महापौरांचा प्रश्न

राज्य सरकारने होम आयसोलेशन अर्थात गृहविलगीकरण (Home Isolation) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांनी विरोध केला आहे.

Home Isolation ban : फ्लॅट, बंगल्यात राहणारे लोक कोव्हिड सेंटरला कसे येतील? पुण्याच्या महापौरांचा प्रश्न
मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 5:22 PM

पुणे : राज्य सरकारने होम आयसोलेशन अर्थात गृहविलगीकरण (Home Isolation) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांनी विरोध केला आहे. “राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी होम आयसोलेशन बंद करून रुग्णांना कोव्हिड सेंटरमध्ये उपचार देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र  पुण्यातील लाट ओसरतीये असा निर्णय घेणं अव्यवहार्य आहे”, असा टोला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लगावला. (Pune Mayor Murlidhar Mohol opposes Health Minister Rajesh Topes decision about no Home Isolation for covid19 patients)

राज्य सरकारने पुणे शहरात रुग्णसंख्या कमी होत असताना असा निर्णय कसा घेतला?, अशी विचारणा मुरलीधर मोहोळ यांनी केली. राज्य सरकारने निर्णय घेतला असेल तर त्याचं आम्हाला पालन करावं लागेल. पण फ्लॅट, बंगलो, मोठ्या इमारतीत राहणारे लोक कोव्हिड सेंटरमध्ये कसे राहतील? त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

18 जिल्ह्यात होम आयोलेशन बंद

गृहविलगीकरणात असूनही अनेक रुग्ण सर्रास बाहेर फिरत आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या घटण्याऐवजी वाढत आहे. परिणामी राज्य सरकारने आता गृहविलगीकरण बंद केलं आहे. अनेक कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असतानाही सुप्रर स्प्रेडर म्हणून फिरत आहेत. त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद केलं आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर राजेश टोपे यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली.

कोणते 18 जिल्हे?

  • बुलडाणा
  • कोल्हापूर
  • रत्नागिरी
  • सांगली
  • यवतमाळ
  • अमरावती
  • सिंधुदुर्ग
  • सोलापूर
  • अकोला
  • सातारा
  • वाशिम
  • बीड
  • गडचिरोली
  • अहमदनगर
  • उस्मानाबाद
  • रायगड
  • पुणे
  • नागपूर

डोअर टू डोअर सर्वेक्षण

म्युकरमायकोसिस संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी हॉस्पिटल्सची बैठक बोलावली. म्युकरमायकोसिस रुग्ण शोधण्यासाठी जिल्हा प्रशासन डोअर टू डोअर सर्वेक्षण करणार आहे. म्युकरमायकोसिसचे बाहेरील जिल्ह्यातील 19 रुग्ण सध्या पुण्यात उपचार घेत आहेत, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

जिल्ह्यातील 53 हॉस्पिटलमध्ये 591 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. गेल्या पाच दिवसात जिल्ह्यात म्युकरमायकोसिससाठी 2860 इंजेक्शनचे वाटप करण्यात आले आहेत. तर जिल्ह्यातील 207 रुग्णांनी आतापर्यंत महात्मा फुले योजनेचा लाभ घेतलाय, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या  

VIDEO: आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती; राजेश टोपेंची मोठी माहिती

‘या’ 18 जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद, यादी जारी; तुमचाही जिल्हा आहे का? पटापट तपासा!

(Pune Mayor Murlidhar Mohol opposes Health Minister Rajesh Topes decision about no Home Isolation for covid19 patients)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.