AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता, यंत्रणा सज्ज, पुणेकरांनो काळजी घ्या, महापौर मोहोळ यांचं आवाहन

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना सावधान करणारं ट्विट केलं आहे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची संभाव्य शक्यता, यंत्रणा सज्ज, पुणेकरांनो काळजी घ्या, महापौर मोहोळ यांचं आवाहन
| Updated on: Nov 18, 2020 | 7:53 AM
Share

पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे आकडे कमी येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना सावधान करणारं ट्विट केलं आहे. तसंच कोरोनाला हद्दपार करण्याचा संकल्पही बोलून दाखवला आहे. (Pune Mayor Murlidhar Mohol tweet on Corona second wave)

जनसंपर्क अधिक असलेले व्यावसायिक, घरगुती कामगार, शासकीय कर्मचारी हे सुपर स्प्रेडरमध्ये येतात. या सुपर स्प्रेडरमुळेच कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत पुणेकरांनी आता ज्यादा काळजी घेणं उचित आहे. आपणा सर्वांनाच अधिकची काळजी घेऊन हे संभाव्य संकट टाळायचं आहे, असं महापौर मोहोळ म्हणाले.

“आगामी काळात कोरोना संसर्ग वाढू शकतो, ही शक्यता विचारात घेऊन आपण नजीकच्या भविष्यकाळातील नियोजन केलंय, यंत्रणाही सज्ज आहेत. पण आपणा सर्वांनाच अधिकची काळजी घेऊन हे संभाव्य संकट टाळायचं आहे. सामूहिकपणे लढून हे दुसरं संकट नक्की टाळता येवू शकेल”, असा विश्वास व्यक्त करत ‘पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार’ असा मानस मोहोळ यांनी व्यक्त केलाय.

सुपर स्प्रेडर व्यक्तींचे सर्वेक्षण करुन त्यांची तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर महापालिका आणि जिल्हा परिषदांना सतर्क राहण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांनी सूचना दिल्या आहेत.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येईलच असे नाही: टोपे

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे, असं विधान राजेश टोपे यांनी केल्याच्या बातम्या सर्वच माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. त्यावर प्रतिक्रिया देताना राजेश टोपे यांनी ही सारवासारव केली होती. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता मी व्यक्त केली होती. ती येईलच असे नाही. पण दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी कोरोना लसीबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोना लसीबाबतची पूर्ण तयारी झाली आहे. फ्रंटलाइन वर्कर्सची यादी तयार झाली आहे. कोल्ड स्टोरेज व्यवस्था पूर्ण होत आली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज होत आहे, असंही ते म्हणाले. जानेवारी फेब्रुवारीपर्यंत लस आलीच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्राला लस कधी उपलब्ध होणार याबाबत आम्ही देशाच्या आरोग्यमंत्र्यांकडून माहिती मागवली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

(Pune Mayor Murlidhar Mohol tweet on Corona second wave)

संबंधित बातम्या

‘सुपर स्प्रेडर’मुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, आरोग्य विभागाकडून भीती व्यक्त

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.