Pune Metro : पुणे मेट्रोतून आठवडेभरात किती जणांनी केला प्रवास, किती झाली कमाई?

Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन केले होते. त्यांनी उद्धाटन करुन आता आठवडा उलटला आहे. पुणेकरांनी मेट्रोला कसा प्रतिसाद दिला आहे, त्याची आकडेवारी समोर आलीय.

Pune Metro : पुणे मेट्रोतून आठवडेभरात किती जणांनी केला प्रवास, किती झाली कमाई?
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 8:38 AM

रणजित जाधव, पुणे | 8 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे शहरात होते. या दिवशी त्यांनी पुणे मेट्रोच्या दोन मार्गाचे उद्घाटन केले. त्यानंतर सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे पुणे मेट्रोचे दोन मार्ग पुणेकरांसाठी सुरु झाले. गेल्या आठवडाभर पुणे मेट्रोतून प्रवास करणारे किती प्रवासी आहेत? याची आकडेवारी समोर आली आहे. तसेच शनिवार अन् रविवारी सुटी असून मेट्रोमधून प्रवास करणारे प्रवासी वाढत असल्याचे दिसून आले.

किती जणांनी केला प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला आठवड्यापूर्वी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर पुणेकरांचा मेट्रोला प्रतिसाद वाढताना दिसत आहे. 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान एकूण 3 लाख 2 हजार 904 प्रवाश्यांनी मेट्रोतून प्रवास केलाय. त्यामुळे अवघ्या सात दिवसांत पुणे मेट्रोची तब्बल 50 लाखांची उलाढाल झाली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांनी तर रविवारची सुट्टीच्या दिवशी मेट्रो प्रवासालाच पसंती दिली आहे. रविवारी दिवसभरात 96 हजारांहून अधिक जणांनी मेट्रोने प्रवास केला आहे. यातून 16 लाख 43 हजार रुपयांची कमाई झाली.

रविवारी किती जणांनी घेतला लाभ

मेट्रोने प्रवास करणाऱ्यांना शनिवार अन् रविवारी सवलत दिली आहे. या दोन दिवसांत 30 टक्के सवलत दिली. यामुळे प्रवाशांची संख्या या दोन दिवसांत चांगलीच वाढ झाली आहे. रविवारी एकाच दिवसांत 96 हजार 498 प्रवाशांनी प्रवास केला. हा आठवडाभराचा विक्रम झाला होता. शनिवारी 57,652 जणांनी मेट्रोतून प्रवास केला होता. म्हणजे 30 टक्के सवलत योजनेचा चांगलाच फायदा प्रवासी घेत आहेत.

हे सुद्धा वाचा

सर्वजनिक वाहतुकीसाठी चांगला पर्याय

पुणे मेट्रो सार्वजनिक वाहतुकीसाठी पुणेकरांना चांगला पर्याय तयार झाला आहे. मेट्रोने प्रवास केल्यानंतर नागरिकांच्या वेळेची बचत होते आहे. तसेच रोज होणाऱ्या  वाहतूक कोंडीतून त्यांची सुटका होत आहे. यामुळे पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या रोज वाढत आहेत. तसेच मेट्रोचा प्रवास प्रदूषणविहरीत आहे. यामुळे पुणे शहरातील वातावरण चांगले राहण्यास मदत होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.