AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Metro : पुणे मेट्रोचा विक्रम, एकाच दिवसांत सर्वाधिक प्रवाशांनी केला प्रवास

Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दोन प्रकल्पांचे उद्घाटन केले. यानंतर मेट्रो पुणेकरांसाठी सुरु झाली. पुणेकरांनी या मेट्रोस रविवारी चांगलाच प्रतिसाद दिला. एकाच दिवसांत प्रवास करण्याचा विक्रम झाला.

Pune Metro : पुणे मेट्रोचा विक्रम, एकाच दिवसांत सर्वाधिक प्रवाशांनी केला प्रवास
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 11:36 AM

पुणे | 7 ऑगस्ट 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोच्या दोन मार्गाचे उद्घाटन झाले. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्ग पुणेकरांना मिळाले. त्यानंतर मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पुणेकरांना मेट्रोचे आकर्षण निर्माण झाले आहे. यामुळे रविवारी सुटी असून मेट्रो प्रवाशांचा विक्रम झाला आहे. आतापर्यंतचा सर्वाधिक प्रवासाचा हा विक्रम झाला आहे.

रविवारी किती जणांनी घेतला लाभ

मेट्रोने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत रविवारी चांगलीच वाढ झाली. एकाच दिवसांत 96 हजार 498 प्रवाशांनी प्रवास केल्याचा विक्रम केला. आतापर्यंत प्रवाशांची ही सर्वोच्च संख्या आहे. पिंपरी चिंचवड मनपा स्टेशनवरुन 13 हजार 393 प्रवाशांनी प्रवास केला. सिव्हील कोर्ट स्थानकावरुन 9,928 तर वनाज स्थानकावरुन 9,872 जणांनी प्रवास केला. एकूण रविवारी 96 हजार 498 प्रवाशांनी मेट्रोची सफर केली आहे. शनिवार अन् रविवारी मेट्रो प्रवास तीन टक्के सुट दिली जाते.

शनिवारी किती जाणांनी घेतला लाभ

शनिवारी 57,652 जणांनी मेट्रोतून प्रवास केला होता. मेट्रोकडून शनिवार आणि रविवारी सवलत देण्यात येत असल्यामुळे या दोन दिवसांत प्रवाशांची संख्या वाढत आहे. उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी मेट्रोतून १० हजार ८२० प्रवाशांनी पिंपरी ते सिव्हील कोर्ट मार्गावर प्रवास केला होता. मेट्रोच्या दोन्ही मार्गावर एकूण ३० हजार ३२० प्रवाशांनी प्रवास केला.

हे सुद्धा वाचा

मेट्रोचे पुणेकरांना आकर्षण

मेट्रोचे पुणे शहरातील नागरिकांना चांगलेच आकर्षण वाटू लागले आहे. यामुळे मेट्रो प्रवासांची संख्या दिवसंदिवस वाढत आहे. पुणेकरांना मेट्रोच्या माध्यमातून आणखी एक पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळाली आहे. मेट्रोने प्रवास केल्यानंतर वाहतूक कोंडीतून सुटका होत आहे. रस्ते मार्गाने जाताना दोन, चार किलोमीटर प्रवासासाठी तासभर जातो. परंतु हाच प्रवास मेट्रोने पाच ते दहा मिनिटात होत आहे.  तसेच यामुळे प्रदूषण होणार नसल्याने वातावरण चांगले राहणार आहे.  यामुळे पुणेकरांच्या पसंतीस मेट्रो आली आहे.

हे ही वाचा

हात दाखवा अन् बस थांबवा नव्हे तर मेट्रोच थांबवा

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.