पुणे मेट्रोचा विक्रम, एकाच दिवसांत इतक्या लाख प्रवाशांनी केला प्रवास

Pune Metro News: सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच मेट्रोचा शिवाजीनगर ते स्वारगेट प्रकल्प सुरु होण्याची शक्यता आहे. या मार्गाची चाचणी काही दिवसांपूर्वी यशस्वी झाली होती. त्यावेळी इतिहासात प्रथमच मुळा-मुठा नदीखालून मेट्रो धावली.

पुणे मेट्रोचा विक्रम, एकाच दिवसांत इतक्या लाख प्रवाशांनी केला प्रवास
Pune Metro
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 4:12 PM

पुणे शहरात मेट्रो सुरु झाल्यानंतर पुणेकरांना दिलासा मिळू लागला आहे. वाहतूक कोंडीत अडकलेल्या पुणेकरांना चांगला पर्याय मिळू लागला आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या दोन मार्गाचे उद्घाटन झाले होते. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल हे दोन मार्ग पुणेकरांना मिळाले होते. त्यानंतर या मार्गांचा विस्तार झाला. पुणे मेट्रो पुणेकरांच्या पसंतीला चांगलीच उतरली आहे. त्यामुळेच रविवारी सुटीच्या दिवशीही मेट्रोतून प्रवास करणाऱ्यांची संख्या चांगली असते. आता पुणे मेट्रोने नवीनच विक्रम केला आहे. आतापर्यंतचा सर्वाधिक प्रवासाचा हा विक्रम झाला आहे. एका दिवसांत पावणे दोन लाख प्रवाशांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला आहे.

प्रवाशांचा नवीन उच्चांक

पुणे मेट्रोतून रविवारी 30 जून रोजी रात्री साडेआठपर्यंत पावणे दोन लाख प्रवाशांनी केला प्रवास केला आहे. आतापर्यंतची ही उच्चांकी प्रवासी संख्या आहे. मागील वर्षी 15 ऑगस्ट रोजी 1.69 लाख प्रवाशांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला होतो. त्या संख्येला आता 30 जून रोजी मागे टाकत नवीन विक्रम झाला आहे. वाढलेल्या प्रवासी संख्येचे श्रेय मेट्रो नेटवर्कच्या अलीकडील विस्ताराला दिले जाऊ शकते. ज्यामुळे दररोज प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. आठवड्याच्या शेवटी 90,000 पेक्षा जास्त आहे.

पुणे स्वारगेट मेट्रो गणेश उत्सावापूर्वी

पुणे शहरात शिवाजीनगर ते स्वारगेट ही भूमिगत मेट्रो सुरु होणार आहे. या प्रकल्पाचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. जुलै अखेरपर्यंत उर्वरित कामे पूर्ण होणार आहे. त्यानंतर शिवाजीनगर कोर्ट ते स्वारगेट मार्गावर मेट्रो धावण्यास सुरुवात होणार आहे. यंदा गणेश उत्सवात या मेट्रोने पुणेकरांना जात येणार आहे. ही मेट्रो सुरु होताच पुणेकरांचा प्रवास अधिक सुखदायी होणार आहे.

हे सुद्धा वाचा

सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच मेट्रोचा शिवाजीनगर ते स्वारगेट प्रकल्प सुरु होण्याची शक्यता आहे. या मार्गाची चाचणी काही दिवसांपूर्वी यशस्वी झाली होती. त्यावेळी इतिहासात प्रथमच मुळा-मुठा नदीखालून मेट्रो धावली.

Non Stop LIVE Update
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?
Hathras : निष्पापांच्या मृत्यूला जबाबदार असणारा भोलेबाबा आहे तरी कोण?.
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो
सत्संगात चेंगराचेंगरी, चिमुकले, म्हाताऱ्या-कोताऱ्यांचाही बळी, एकच टाहो.
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण
'या' 8 ठिकाणावर पिकनिकला जाताय? मग ग्रुपने एन्जॉय करता येणार नाही कारण.
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस
'या' महिन्यात महाराष्ट्र चिंब भिजणार, तुमच्या जिल्ह्यात कसा पडणार पाऊस.
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी
अंबादास दानवेंच्या 'त्या' शिवीगाळच्या वक्तव्यावरून ठाकरेंकडून माफी.
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?
विधान परिषदेच्या 11 जागा अन् 12 जण रिंगणात, कोणाची मतं फुटणार?.
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500
लाडकी बहीण योजना, सरकारनं बदलला निर्णय, या कागदपत्रांशिवाय मिळणार 1500.
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?
संसदेत मोदींना बोलणंही अवघड, विरोधकांचा एकच गोंधळ; सभागृहात काय घडलं?.
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर
'जयंतराव तुम्ही नकली वाघांसोबत असली... ', मुख्यमंत्र्यांची थेट ऑफर.
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा
दिवे घाटातील माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य; ड्रोनमध्ये कैद नजारा.