पुणे मेट्रोकडून नववर्षाची भेट, मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या, आता केवळ इतक्या वेळेत मिळणार मेट्रो

Pune Metro | १ जानेवारी २०२४ पासून पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेच्या विस्तारामुळे जास्तीत जास्त लोकांना प्रवास करणे शक्य होणार आहे. पुणेकरांच्या वेळेची देखील बचत होणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी ऑफिस जाण्याच्या/ येण्याच्या वेळेत होणारी गर्दी कमी होईल.

पुणे मेट्रोकडून नववर्षाची भेट, मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या, आता केवळ इतक्या वेळेत मिळणार मेट्रो
Pune Metro
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 1:51 PM

रणजित जाधव, पुणे, दि.26 डिसेंबर | पुणेकरांनी मेट्रोला भरभरुन प्रतिसाद दिला. यामुळे आता मेट्रोनेही पुणेकरांसाठी पाऊल उचलले आहे. नवीन वर्षापासून पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. आता गर्दीच्या वेळेत दहा मिनिटांऐवजी फक्त ७.५ मिनिटांनी मेट्रो मिळणार आहे. यामुळे पुणेकरांना मेट्रोची वाट पाहत थांबावे लागणार नाही. १ ऑगस्ट २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक आणि फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट मार्गाचे लोकार्पण केले होते. आता पुणे मेट्रोच्या या मार्गावर प्रवासी सेवेचा विस्तार झाला आहे.

काय केला बदल

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी अशी मार्गातील एकूण २४ किमी मार्गावर प्रवासी सेवा सुरु झाली आहे. उर्वरित ९ किमी मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. लवकरच पुणे मेट्रोची पहिल्या टप्प्यातील संपूर्ण मार्ग प्रवाश्यांसाठी खुला होणार आहे. लोकांमधील पुणे मेट्रोचा प्रवासासाठी होणारा वाढता वापरामुळे मेट्रोने सेवा वाढवली आहे. पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सुरु असते. यामध्ये सकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत मेट्रोच्या दर १५ मिनिटांनी मेट्रो होती. त्यात सकाळी ८ ते ११ या वेळेत १० मिनिटांनी मेट्रो होती. त्यात बदल केला असून फेऱ्या वाढवल्या आहेत.

आता दर ७.५ मिनिटांनी मेट्रो

१ जानेवारी २०२४ पासून मेट्रो दोन्ही मार्गिकांवर बदल केला आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत दर १५ मिनिटांनी मेट्रोची फेरी होती. ती आता १० मिनिटांनी करण्यात आली आहे. सकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत मेट्रो दर १० मिनिटांनी असणार आहे. तसेच सकाळी ८ ते ११ हा गर्दीचा वेळ आहे. या वेळी कार्यालयात जाणारे अनेक लोक असतात. यामुळे या वेळेत दर ७.५ मिनिटांनी मेट्रो असणार आहे. दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत दर ७.५ मिनिटांनी मेट्रो असणार आहे. यामुळे प्रवाश्यांच्या प्रतिक्षेचा कालावधी कमी होणार आहे. त्यांच्या वेळेची बचत होईल.

हे सुद्धा वाचा

मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या

पुणे मेट्रो दिवसांमधील वारंवारता वाढणार आहे. या आधी दिवसभरात मार्ग १ वर ८१ फेऱ्या होत होत्या. त्या आता ११३ फेऱ्या होणार आहेत. मार्ग २ वर ८० फेऱ्या होत होत्या. त्या १११ फेऱ्या होणार आहेत. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हंटले आहे की, १ जानेवारी २०२४ पासून होणाऱ्या प्रवासी सेवेच्या विस्तारामुळे मेट्रोच्या प्रवासी वेळेत जास्तीत जास्त लोकांना प्रवास करणे शक्य होणार आहे. वेळेची देखील बचत होणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी ऑफिस जाण्याच्या/ येण्याच्या वेळेत होणारी गर्दी कमी होईल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.