Pune Metro : पुणे मेट्रो आणखी चार मार्गांवर, कोणत्या मार्गांवर होणार मेट्रोचा विस्तार
Pune Metro : पुणे मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑगस्ट रोजी केले. आता पुन्हा पुणेकरांसाठी चांगली बातमी आहे. पुणे मेट्रोचा विस्तार होणार आहे. त्यासाठी पावले उचलली गेली आहे. चार मार्गांवर पुणे मेट्रो सुरु होणार आहे.
पुणे | 5 ऑगस्ट 2023 : पुणेकरांसाठी चांगली बातमी आहे. पुणेकरांना नुकतीच मेट्रोची सेवा मिळाली. पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी मेट्रोचे लोकार्पण केले. त्यानंतर दोन मार्गावर पुणे मेट्रो सुरु झाली. एकूण २४ किलोमीटरपर्यंत पुणे मेट्रो आता सुरु झाली आहे. वनाझ ते रूबी हॉल आणि पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट हे दोन मार्ग १ ऑगस्ट रोजी सुरु झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेने आणखी चार मार्गांसंदर्भात निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे मेट्रोचा विस्तार आणखी होणार आहे. आता सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या भागातून पुणे मेट्रो जाणार आहे. यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.
कोणते चार मार्ग सुरु होणार
- वनाज ते चांदणी चौक
- रामवाडी ते वाघोली
- खडकवासला ते खराडी
- पौड फाटा ते माणिकबाग
एकूण प्रकल्पाचा खर्च किती
पुणे मेट्रोच्या चार मार्गांचा खर्च 12 हजार 683 कोटी रुपये आहे. या मार्गांच्या प्रकल्प आराखड्यास आणि भूसंपादनासाठी 7 कोटींच्या खर्चाला स्थायी समितीकडून मंजुरी देण्यात आली. महामेट्रोने वनाजपासून ते चांदणी चौक या मार्गासाठी डिपीआर सादर केला. हा मार्ग 1.2 किलोमीटरचा आहे. तसेच रामवाडी ते वाघोली या 11.63 किलोमीटर मार्गासाठी डीपार दिला होता. त्यास पुणे मनपाच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. खडकवासला ते खरडा हा मार्ग सर्वात मोठा आहे. 25.86 किलोमीटरचा हा मार्ग आहे. तर पौड फाटा ते माणिकबाग हा मार्ग 6.11 किलोमीटरचा आहे.
या लोकांना दिलासा मिळणार
पुणे शहरातील सिंहगड रस्ता हा सर्वात जास्त कोंडी असणार मार्ग आहे. त्या मार्गावर मेट्रो सुरु होणार असल्यामुळे वाहतूक कोंडीतून पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. तसेच खडकवासला ते खराडी अशी मेट्रो सुरु झाल्यामुळे सोलापूर रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. पुणे शहरातील पाहिले वाहिले भूमिगत मेट्रो स्थानक शिवाजी नगर मेट्रो स्टेशन आहे.
मेट्रो मार्गाचे अंतर असे
- वनाज ते चांदणी चौक : 1.2 किमी
- रामवाडी ते वाघोली : 11.63 किमी
- खडकवासला ते खराडी : 25.86 किमी
- पौड फाटा ते माणिकबाग : 6.11 किमी