Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | ‘परवानगीविना फोटो कसे घेता?’ महिला अधिकाऱ्याचा प्रश्न, पुण्यात मनसे नगरसेवकाने झापलं

छोट्या-छोट्या कोव्हिड सेंटरलाही रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळालीच पाहिजेत, अशी मागणी वसंत मोरेंनी केली (Pune Vasant More ruckus Remdesivir )

VIDEO | 'परवानगीविना फोटो कसे घेता?' महिला अधिकाऱ्याचा प्रश्न, पुण्यात मनसे नगरसेवकाने झापलं
पुण्यात मनसे नगरसेवकाचा राडा
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 3:30 PM

पुणे : पुण्यातील मनसे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी रेमडेसिव्हीर इंजेक्शनवरुन राडा केला. छोट्या-छोट्या कोव्हिड सेंटरलाही रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळालीच पाहिजेत, अशी मागणी मोरेंनी केली. या घटनेचं लाईव्ह वसंत मोरे यांनी स्वतःच्या फेसबुक अकाऊण्टवरुन केलं. ‘परवानगीविना फोटो कसे घेता?’ असा प्रश्न विचारणाऱ्या महिला अधिकाऱ्यालाच मोरेंनी झापलं (Pune MNS Corporator Vasant More ruckus over Remdesivir injection to COVID Centers)

“हे लोकं चुका करणार… आज या डॉक्टरांकडची परिस्थिती ऐका… रेमडेसिव्हीर इंजेक्शन नाही म्हणून रोज आठ ते दहा पेशंट शिफ्ट करावे लागत आहेत. बाहेरच्यांना बेड मिळत नाहीत. आम्ही बोलायला गेलो की अधिकारी टेबलवरुन उठून जातात. आम्ही आमच्या घरच्यांसाठी मागतोय काय? कुठवर जीआर दाखवणार? आमची लोकं मरायला लागलीत तरी? एक नगरसेवक काम करतोय, तर त्याला सपोर्ट करायचा सोडून तुम्ही त्याला बाहेर खेचता” अशा शब्दात वसंत मोरे यांनी संताप व्यक्त केला.

“सौम्य लक्षणं म्हणताय.. तुम्ही आला होतात का मॅडम आमच्याकडे बघायला?” असं वसंत मोरे म्हणताच तिथल्या महिला अधिकाऱ्याने स्थायी समितीकडे दिल्याचं सांगितलं. कॅमेराकडे बोट दाखवून महिलेने बंद करण्याची सूचना केली. त्यावर वसंत मोरेंनी भडकून “नाही बंद करणार, माझा हक्क आहे तो” असं उत्तर दिलं. “एका स्त्रीचे फोटो घेण्याआधी तुम्ही परवानगी घेतलीत का?” असा प्रतिप्रश्न महिला अधिकाऱ्याने केला असता आपण फेसबुक लाईव्ह करत असल्याचं मोरेंनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ 

“पाच दिवसात जर मी एकटा साई स्नेह हॉस्पिटलच्या मदतीने एका हॉटेलच्या हॉलमध्ये 40 बेड ऑक्सिजन आणि 40 बेड होम आयसोलेशन हॉस्पिटल चालू करू शकतो, तर मग पुणे महानगरपालिकेच्या 168 नगरसेवकांनी प्रत्येकी फक्त 10 बेड केले असते तर आज संपूर्ण पुणे शहरात 1680 बेड तयार झाले असते. आणि आपण पुणेकरांना वाचवू शकलो असतो. अजूनही वेळ गेलेली नाही.” असं ट्वीट मनसे नगरसेवक वसंत मोरे यांनी केलं आहे.

वसंत मोरेंची कोरोनाग्रस्तांना मदत

याआधीही वसंत मोरे यांनी कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात दिल्याचं त्यांच्या ट्विटर अकाऊण्टवर दिसतं. 27 वर्षांची तरुणी सिद्धी परदेशी अनेक दिवसांपासून अनेक आजारांनी ग्रस्त. त्यात भरीला भर कोरोनाने गाठलं. तिला पुण्यात बेड मिळाला नाही. तेव्हा मनसे कार्यकर्त्यांनी तिला चाकणला बेड मिळवून दिला. या पोरांसारखे नगरसेवक जर पुणेकरांनी माझ्या साथीला 2022 ला निवडून दिले तर कोरोनासारख्या अडचणीलाही सहज हरवेन, असा विश्वास वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.

पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली

कोरोनामुळे निधन झालेल्या नातेवाईकाचे पार्थिव नेण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने गेल्या वर्षी वसंत मोरे यांनीच पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली होती. तेच वसंत मोरे उर्फ ‘तात्या’ भेटायला येणार आहेत, असं समजताच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या निवृत्त शिक्षकाचं बिलही माफ झालं होतं. खुद्द वसंत मोरेंनीच सोशल मीडियावरुन हा किस्सा सांगितला होता.

संबंधित बातम्या :

रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने संताप, पुण्यात मनसे नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली

Video | “योग्य वेळी दांडक्याला हात घातला” पुणे पालिका अधिकाऱ्यांची गाडी फोडणाऱ्या मनसे नगरसेवकाचा नवा किस्सा

VIDEO | पुण्यात मनसे नगरसेवकाने करुन दाखवलं, हॉटेलच्या हॉलमध्ये 40 ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल

(Pune MNS Corporator Vasant More ruckus over Remdesivir injection to COVID Centers)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.