MPSC उत्तीर्ण दर्शना पवार मृत्यू प्रकरणास धक्कादायक वळण, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा

Pune Darshana Pawar : पुणे येथील MPSC परीक्षा पास उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा मृत्यूबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून ही माहिती आली आहे. यामुळे या प्रकरणास वेगळेच वळण मिळाले आहे.

MPSC उत्तीर्ण दर्शना पवार मृत्यू प्रकरणास धक्कादायक वळण, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मोठा खुलासा
darshana pawar
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 9:18 AM

पुणे : पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी सकाळी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याची ओळख पटवणे अवघड जात होते. या प्रकरणात पोलिसांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. या मुलीसोबत असलेला तरुणीही बेपत्ता आहे. या प्रकारात पोस्टमॉर्टमचा अहवाल आला आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काय आहे अहवालात

रविवारी दर्शना पवार हिचा मृतदेह सापडल्यानंतर त्याचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. या पोस्टमॉर्टम रिपोर्टचा अहवाल समोर आला आहे. त्यातून धक्कादायक माहिती मिळाली आहे. दर्शना पवार हिचा मृत्यू सामान्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळल्या आहे. यामुळेच तिचा मृत्यू झाला असल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट केले आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतात पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या खून प्रकरणात दर्शनाच्या मित्रावर संशयाची सूई जात आहे. तो दर्शनासोबत होता. परंतु अजूनही बेपत्ता आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी केली पाच पथके

दर्शनाचा खून झाल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी 5 पथके तयार केली आहेत. दर्शनाचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे याच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पथके रवाना झाली आहे. दर्शना ९ जून रोजी पुण्यातील सत्काराच्या कार्यक्रमासाठी स्पॉट लाईट ॲकॅडमी येथे आली होती. ११ जून सायंकाळी चार वाजेपर्यंत घरच्या मंडळीच्या संपर्कात होती. मात्र १२ रोजी दर्शनाने फोन उचलले नाहीत. यामुळे कुटुंबियांनी स्पॉट लाईट ॲकॅडमी येथे येऊन तिची चौकशी केली. त्यावेळी सांगण्यात आले की, दर्शना ही त्याचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे हिच्यासोबत सिंहगड आणि राजगड याठिकाणी फिरण्यासाठी गेली आहे. मात्र हे दोघेही संपर्कात नाहीत.

रविवारी सापडला मृतदेह

पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी रविवारी १८ जून रोजी दर्शना दत्तू पवार हिचा मृतदेह सापडला. रविवारी सकाळी राजगडच्या पायथ्याशी हा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतु दर्शनाचा मित्र राहुल संपर्कात अजूनही नाही किंवा त्याचा पत्ताही लागला नाही.

राहुल आहे तरी कुठे

दर्शना आणि राहुल दोघेही 12 जूनला साधारण 8 वाजून 15 मिनिटांनी गडाच्या पायथ्याशी पोहचले. त्यानंतर दोघांनीही गड चढायला सुरुवात केली. हे सर्व CCTV फुटेजमध्ये दिसले. फुटेजमध्ये दोघेही राजगडावर जाताना दिसत आहेत. मात्र त्यानंतर 10 वाजताच्या सुमारास राहुल एकटाच परत आला. त्याचे मोबाइलचं लोकेशन परराज्यात दिसत आहे. त्यानंतर तो बेपत्ता आहे? राहुल नेमका कुठे आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत.

हे ही वाचा

पुण्यातून आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या MPSC उत्तीर्ण विद्यार्थीनीचा गुढ मृत्यू

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.