AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai-Pune Expressway : पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर गाडी चालवताना सावधान, नियम मोडल्यास…

Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होते. तसेच अपघात होत असतात. अनेक अपघात वाहनचालकांनी नियम मोडल्यामुळे होतात. आता या मार्गावर नियम मोडणाऱ्यांवर २४ तास लक्ष असणार आहे...

Mumbai-Pune Expressway : पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर गाडी चालवताना सावधान, नियम मोडल्यास...
mumbai - pune expresswayImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 12:09 PM

पुणे | 10 सप्टेंबर 2023 : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वारंवार अपघात होत असतात. तसेच या मार्गावर वाहतुकीची कोंडी नेहमी होत असते. केंद्र सरकारकडून या एक्स्प्रेससाठी महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल केला गेला आहे. या सर्व प्रकारावर मार्ग काढण्यासाठी हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ऑक्टोंबर महिन्यापर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. या प्रकल्पावर सुमारे १६० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. इंटेलिजन्स ट्रॅफीक मॅनेजमेंट प्रणाली (ITMS) असा हा प्रकल्प असणार आहे.

नेमका काय आहे प्रकल्प

केंद्र सरकारकडून पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर अपघात कमी करण्यासाठी पावले उचलली आहे. या महामार्गावर प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी 430 सीसीटीव्ही कॅमरे इंस्टाल केले जात आहे. हे हायटेक कॅमरे अद्यावत आहे. त्याची दृश्यमानता चांगली आहे. यामुळे वेगाची मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांना काही मिनिटांत ट्रेस केले जाईल.

कधीपर्यंत होणार काम

एमएसआरडीसीकडून पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर कॅमेरे बसवण्याचे काम सुरु झाले आहे. हे काम ऑक्टोंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. महामार्गावरील 106 जागांवर 430 हायटेक सीसीटीव्ही कॅमरे बसवले जाणार आहेत. एमएसआरडीसीचे एमडी संजय यादव यांनी सांगितले की, पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर लावण्यात आलेले सर्व कॅमेरे फायबर नेटवर्कच्या माध्यमातून केंद्रीय नियंत्रण कक्षाला जोडले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

असे चालणार काम

इंटेलिजन्स ट्रॅफीक मॅनेजमेंट प्रणाली वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यात वेगाने वाहन चालवणे, लेन मोडने, चुकीच्या लेनमधून वाहन चालवणे यासह इतर वाहतुकीच्या नियमांवर लक्ष ठेवले जाणार आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास त्वरीत नियंत्रण कक्षातून संदेश जाईल आणि संबंधित वाहनधारकावर कारवाई करण्यात येईल.

असा वसूल केला जाणार दंड

इंटेलिजन्स ट्रॅफीक मॅनेजमेंट प्रणालीमुळे वाहनधारकांकडून दंडही वसूल होणार आहे. त्यासाठी नंबर प्लेटवरुन नियम मोडणाऱ्या वाहनांची ओळख केली जाणार आहे. तसेच टोलबुथवर ऑटोमैटिक वाहन काउंटर आणि क्लासिफायर इंस्टॉल केला जाणार आहे. मोबाइल वॅन असणार आहे. हे सर्व कॅमेरे लोणावळ्यातील कमांड सेंट्रलमधील कंट्रोल रुमला जोडले जाणार आहे.

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.