पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर पुन्हा अपघात, दहा दिवसांत सहा वेळा मार्ग बंद

Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी, अपघात अन् दरड कोसळण्याच्या घटना गेल्या दहा दिवसांत झाल्या आहेत. गुरुवारी पुन्हा महामार्गावर अपघात झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर पुन्हा अपघात, दहा दिवसांत सहा वेळा मार्ग बंद
pune mumbai expressway accident
Follow us
| Updated on: Aug 04, 2023 | 9:50 AM

पुणे | 4 ऑगस्ट 2023 : पुणे-मुंबई अन् मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरुन प्रवास करणाऱ्या लोकांनाही वाहतूक कोंडीचा फटका सध्या वारंवार बसत आहे. एक्स्प्रेस वे वर मोठा टोल भरुन प्रवास करणाऱ्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या दहा दिवसांत विविध कारणांमुळे सहा वेळा एक्स्प्रेस वे बंद राहिला. यामुळे द्रुतगती महामार्ग कासवगती मार्ग झाला आहे. गुरुवारी बोरघाट पोलीस चौकीसमोर दोन ट्रकचा अपघात झाला. त्यामुळे खंडाळा घाटात मुंबई मार्गिका बंद करण्यात आली होती.

दहा दिवसांत सहा वेळा बंद

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग गेल्या दहा दिवसांत सहा वेळा बंद राहिला. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स्प्रेस वेची पाहणी केली होती. त्यानंतर दरड प्रवण क्षेत्रात जाळ्या लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तीन वेळा ब्लॉक घेऊन एक्स्प्रेसवरील वाहतूक बंद करुन जाळ्या बसवण्याचे काम करण्यात आले. मागील दहा दिवसांत तब्बल सहा वेळा मुंबई-पुणे महामार्गावरील लेन बंद राहिली. त्यात मेगा ब्लॉक अन् अपघात हे कारणे आहे. यामुळे या महामार्गावर कासवगतीने वाहतूक होत आहे.

या घडल्या घटना

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर २४ जुलै रोजी दरड कोसळली होती. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर २५ जुलै रोजी दोन तासांचा ब्लॉक घेऊन दरड हटवण्याचे काम सुरु केले. त्यानंतर पुन्हा तीन दिवसांनी मेगा ब्लॉक घेतला गेला. कामशेत बोगदाजवळ दरड कोसळली होती. त्यावेळी पुन्हा वाहतूक ठप्प झाली होती. ही दरड हटवण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला.

हे सुद्धा वाचा

गुरुवारी झाला अपघात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर बोरघाट पोलीस चौकीजवळ दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातमधील एक ट्रक काचेची वाहतूक करत होता. अपघातानंतर या काचा रस्त्यावर पसरल्या. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. यावेळी वाहतूक पुन्हा जुन्या महामार्गावर वळवण्यात आली होती. आता शुक्रवारी या महामार्गावरील वाहतूक सुरुळीत सुरु झाली आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.