Mumbai-Pune Express : सलग सुट्यांमुळे पुणे, मुंबई एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी, १२ किलोमीटरपर्यंत रांगा

Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडीचा फटका हजारो वाहनधाराकांना बसला आहे. एक्स्प्रेस वे असणाऱ्या या मार्गावर तब्बल १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

Mumbai-Pune Express : सलग सुट्यांमुळे पुणे, मुंबई एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी, १२ किलोमीटरपर्यंत रांगा
Image Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 2:49 PM

रणजित जाधव, पुणे | 12 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात शनिवारी चांदणी चौक पुलाचे लोकर्पण झाले. वाहतूक कोंडीमुळे या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात आला. त्यामुळे पुणे शहरातील चांदणी चौकाची समस्या सुटणार आहे. या कार्यक्रमात पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर नितीन गडकरी, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी मनोगत मांडत सूचनाही केल्या. नवीन प्रकल्प राबण्यावर भर दिला. त्याचवेळी पुणे, मुंबई एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी होत होती. सलग सुट्यामुळे बाहेर पडलेल्या पुणे आणि मुंबईकरांना या वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला.

सुटी आली की वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी (Traffic Issue) ही पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील एक गंभीर समस्या बनली आहे. गेल्या महिन्यात दरड कोसळण्याच्या घटनामुळे तीन, चार वेळा वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर अपघातामुळे वाहतूक कोंडीची समस्या या मार्गावर आहे. बोरघाटात ही समस्या नेहमी होत आहे. मागील आठवड्यात मेगा ब्लॉग घेऊन दरड कोसळणारा भागावर कामे करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

आता पुन्हा वाहतूक कोंडी

शनिवार, रविवार आणि मंगळवार, बुधवार अशा सलग सुट्टया आल्या आहेत. सोमवारची सुटी घेतल्यानंतर पाच दिवसांच्या सुट्या मिळत आहे. मंगळवारी १५ ऑगस्ट तर १६ ऑगस्ट रोजी पारशी नूतनवर्षाची सुटी आली आहे. यामुळे पुणे, मुंबईकर पर्यटनासाठी बाहेर पडले. एकाच वेळी पाच सुट्या मिळाल्याने मोठ्या संख्येने गाड्या मार्गावर आल्या. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. शनिवारी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. बोरघाटात तब्बल 12 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

महामार्गाचा विस्तार होणार

मुंबई पुणेसाठी एक्स्प्रेस-वे तयार करताना रोज ४० हजार वाहने जातील, असा अंदाज घेऊन महामार्ग तयार केला गेला. परंतु सध्या या महामार्गावरुन रोज ६० हजार वाहने जात आहे. शनिवार अन् रविवार आल्यावर ही संख्या वाढते. अगदी ८० ते ९० हजारांवर ही संख्या जाते. यामुळे एक्स्प्रेस आठ लेन होणार आहे. यासाठी साडेचार हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. जुना मार्गवरही दोन लेन वाढवण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.