Video : सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी, 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा

Pune-Mumbai Expressway : शनिवार अन् रविवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास तयार नाही. रविवारी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी निर्माण झालीय.

Video : सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी, 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा
pune mumbai expressway traffic jam
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 2:56 PM

रणजित जाधव, पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर (Pune-Mumbai Expressway) सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाली आहे. शनिवारी सकाळी पुन्हा मुंबईच्या बाजूला वाहतूक कोंडी ठप्प झाली होती. रविवारी पुन्हा वाहतूक कोडींमुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत होते. शनिवार आणि रविवारमुळे या एक्स्प्रेसवर वाढणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोडी होऊ लागली आहे. एक्स्प्रेसचा मोठा टोल भरुन प्रवास करणाऱ्या लोकांचा वेळ या वाहतूक कोंडीमुळे वाया जात आहे.

आधी शनिवारी झाली वाहतूक ठप्प

हे सुद्धा वाचा

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंबईच्या बाजूला शनिवारी सकाळी ९.३० वाजता वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. या रांगा दोन किलोमीटरपर्यंत लागल्या. नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मनस्ताप होत होता. शनिवार आणि राविवारी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन नियोजन करण्याची गरज आहे. परंतु त्याकडे महामार्ग पोलीस लक्षच देत नाही.

रविवारी कुठे झाली वाहतूक कोंडी

पुणे मुंबई एक्सप्रेस-वे वर लोणावळा एक्झिटला रविवारी वाहतूक कोंडी झाली. पुणे मुंबई एक्सप्रेस-वे वर मुंबई कडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहनांची प्रचंड कोंडी झालीय. सुट्ट्या संपवून आता नागरिक पुन्हा मुंबईकडे निघाले असल्याने लोणावळा एक्झिटजवळ वाहतूक कोंडी झाली आहे. 4 ते 5 किलोमीटरच्या मोठ्या रांगा एक्सप्रेस हायवेवर दिसून येत आहे. त्यामुळे सुट्ट्या संपवून घरी जाणाऱ्या नागरिकांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

वारंवार होते वाहतूक ठप्प

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वारंवार वाहतूक ठप्प होत असते. बोरघाटात मागील आठवड्यात अपघात झाला होता. त्यामुळे वाहतूक ठप्प झाला होता. या मार्गावर बोरघाट उतरत असताना ब्रेकफेल झाल्यानं चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक तिसऱ्या लेनवर पलटला. त्यापूर्वी 27 एप्रिलला ट्रकचा असाच ब्रेकफेल झाल्यानेच विचित्र अपघात झाला होता. मुंबई-पुणे महामार्गावर अनेक अपघाताच्या घटनाही घडतात. त्यापूर्वी एकूण अकरा वाहनं एकमेकांना धडकली होती. या अपघातानंतर एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी आहे. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.