pune railway | पुणे शहराजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडण्याचा प्रयत्न, समाजकंटक की…

Pune railway | पुणे-मुंबई दरम्यान रेल्वे अपघात घडवण्याचा प्रयत्न झाला. परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांचा सतर्कतेमुळे हा अपघात टळला. आता यामागे समाजकंटक आहे की कोण? याचा शोध रेल्वेच्या इंटेलिजन्स विभागाकडून सुरु करण्यात आलाय.

pune railway | पुणे शहराजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडण्याचा प्रयत्न, समाजकंटक की...
INDIAN RAILWAY Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 11:46 AM

पुणे | 7 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहराजवळ रेल्वेची मोठी दुर्घटना टळली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे रेल्वे अपघात घडवण्याचा डाव फसला. आता या प्रकरणाची रेल्वे इंटेलिजन्स विभागाकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास रेल्वे सुरक्षा बलाकडून सुरु करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी हा प्रकार उघड झाला. या मार्गावरुन मुंबईकडे 16339 ही गाडी जाणार होती. आकुर्डी- चिंचवड दळवी नगर पुलाखाली हा प्रकार घडला.

काय घडला प्रकार

आकुर्डी- चिंचवड दळवी नगर पुलाखाली रेल्वे रुळांवर मोठ-मोठे दगड ठेवण्यात आले होते. त्या माध्यमातून रेल्वेचा भीषण अपघात घडवण्याचा प्रयत्न शुक्रवारी झाला. रेल्वे गार्ड संदीप भालेराव यांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी रेल्वे स्टेशन मास्टरांना हा प्रकार सांगितला. तातडीने रेल्वेची सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. शुक्रवारी चार ते साडेचार दरम्यान ही घटना घडली. अप लाईन म्हणजे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रुळावर हे दगड ठेवण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

आता इंटेलिजन्स विभाग करणार चौकशी

रेल्वेचा अपघात करण्यामागे कोण आहे? याचा शोध पोलीस घेणार आहे. आता रेल्वे इंटेलिजन्स यंत्रणेकडून तपास सुरु केला गेला आहे. तसेच रेल्वे सुरक्षा दल म्हणजे आरपीएफकडून या संदर्भात तपास सुरू केला गेला आहे. या घटनेमागे समाजकंटक आहे की अन्य कोण आहे? याचा शोध तपास यंत्रणेकडून घेतला जाणार आहे.

संध्याकाळी असा पिक अवर

पुणे -मुंबई दरम्यान संध्याकाळी पिक अवर असतो. संध्याकाळच्या वेळेस अनेक रेल्वे गाड्या या मार्गावरुन जात असतात. तिच वेळ साधत रेल्वे ट्रॅकवर दगड ठेवण्यात आले. गार्डचा लक्षात हा प्रकार आला नसता तर एखाद्या गाडीचा अपघात झाला असता आणि हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला असता. परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांमुळे हा अपघात टळला. या प्रकरणी आरोपींना त्वरीत अटक करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.