Monsoon News : पुढील पाच दिवस पावसाचा काय आहे अंदाज? पुणे आयएमडीने दिले महत्वाचे अपडेट

Monsoon and Rain in Maharashtra : राज्यात मान्सून दाखल झाला आहे. मुंबई, पुणे शहरात पावसाने जोर पकडला आहे. त्यानंतर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांत पाऊस सुरु झाला आहे. पुणे हवामान विभागाने मान्सूनची पुढील पाच दिवसांची माहिती दिली आहे.

Monsoon News : पुढील पाच दिवस पावसाचा काय आहे अंदाज? पुणे आयएमडीने दिले महत्वाचे अपडेट
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 9:51 AM

अभिजित पोते, पुणे : राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. दरवर्षी केरळमध्ये १ जून रोजी येणारा मान्सून यंदा ४ जून रोजी आला. त्यानंतर महाराष्ट्रात म्हणजेच कोकणात ११ जून रोजी आला. ४ जून ते ११ जून दरम्यान मान्सूनचा प्रवास बिपरजॉय चक्रीवादळाने रोखला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात १५ जून रोजी येणारा मान्सून चक्रीवादळामुळे उशीराने आला. राज्यात २५ जून रोजी मान्सून आल्याची घोषणा हवामान विभागाने केली. आता गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनची दमदार वाटचाल पुणे, मुंबईत सुरु आहे. राज्यात पुढील पाच दिवस मान्सून कसा असणार याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

काय आहे अंदाज

पुणे शहरात मंगळवारपासून पुढील पाच दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे शहरात २ जुलैपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

हे सुद्धा वाचा

नवी मुंबई, मुंबई, ठाणे शहरात गेल्या 24 तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. आता पुढील दोन दिवस संपूर्ण कोकणसह मुंबई, ठाणे आणि मध्य महाराष्ट्र, पुणे, नाशिक, सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भाच्या काही भागांसह अन्य काही भागात यलो अलर्ट दिला आहे.

दोन दिवसांत किती झाला पाऊस

पुणे शहरात दोन दिवसांत २५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच जून महिन्यामध्ये एकूण ४५ मिमी पाऊस झाला आहे. यंदा जून महिन्यात गेल्या काही वर्षांतील सर्वात कमी पाऊस असणार आहे.

पुणे मनपा सज्ज

पुणे शहरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे पुणे शहरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास महानगरपालिकेनेही तयार केली आहे. पूर परिस्थिती रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून स्वतंत्र पथके तयार केली आहे. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची पथके 24 तास सज्ज राहणार आहे. तसेच शहरातील अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचत असते. त्याचा निचरा करण्यात येणार आहे. पुणेहीच पूर परिस्थिती टाळण्यासाठी महापालिकेने तयार केली कर्मचाऱ्यांची पथके

नाशिकमध्ये अलर्ट

हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नाशिकमध्ये सोमवारी दिवसभरात 3.3 मिमी पावसाची नोंद झाली. शहरात दिवसभर रिमझिम पाऊस सुरु होता.

Non Stop LIVE Update
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय.
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना...
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना....
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी.
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.