Corona Vaccination | पुण्यात लसीकरणाला आणखी गती मिळणार, 86 केंद्र वाढवण्याचा निर्णय
त्यामुळे पुण्यातील एकूण लसीकरण केंद्राची संख्या 200 च्या आसपास वाढणार आहेत. (Pune Municipal increase 86 corona vaccination center)
पुणे : राज्यात ठिकठिकाणी कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीकरण मोहिमही जोरदार सुरु आहे. पुण्यात लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे. पुण्यातील लसीकरणासाठी आणखी 86 केंद्र वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण लसीकरण केंद्राची संख्या 200 च्या आसपास वाढणार आहेत. (Pune Municipal increase 86 corona vaccination center)
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यात येत आहे. सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरणाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रसेर राहिले. यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीमुळे आणि नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची कामगिरी बजावली होती.
सध्या 109 केंद्रांवर कोरोना लसीकरण
पुणे जिल्ह्यात दररोज एक लाख नागरिकांना लस देण्याचा संकल्प पुणे विभागाने केला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने 86 केंद्रांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. या सर्व लसीकरण केंद्रांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुण्यात 86 केंद्र वाढवली जाणार असल्याने लसीकरणाला वेग मिळणार आहे.
पुण्यात सध्या 109 केंद्रांवर कोरोना लसीकरण केले जात आहे. त्यात आणखी 86 केंद्रांची भर पडणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली आहे.
राज्यात दररोज 4 लाख नागरिकांचे लसीकरण
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखाहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. राज्यात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाने लसींचा अधिकाधिक पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात सुमारे एक कोटी सहा लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 88 लाख डोसेसचा वापर झाला आहे. महाराष्ट्रात डोस वाया जाण्याचे प्रमाण तीन टक्के आहे. ते अत्यंत कमी असून राष्ट्रीय सरासरीच्या देखील निम्मे आहे. दोन दिवसांपूर्वी 5 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात 81 लाख 21 हजार 332 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. राज्यात दररोज 4 लाख नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. (Pune Municipal increase 86 corona vaccination center)
संबंधित बातम्या :
25 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासह राजेश टोपे यांच्या केंद्राकडे महत्वाच्या मागण्या, वाचा सविस्तर