पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात मोठा निर्णय, आता यामुळे मार्गच बदलला
Pune Nashik Semi High Speed Railway: अहमदनगर जिल्ह्यात खोडद (ता. जुन्नर) येथे जीएमआरटीचा महाकाय दुर्बिणीचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प फक्त भारतासाठीच नाही तर २३ देशांसाठी महत्वाचा आहे. या प्रकल्पाचे स्थलांतर करण्यास शास्त्रज्ञांचा विरोध होता.
Pune Nashik Semi High Speed Railway: पुणे आणि नाशिक राज्यातील दोन महत्वाची शहरे रस्ते मार्गाने जोडले आहे. परंतु या दोन्ही शहरांना जोडणारा रेल्वे मार्ग अजूनही नाही. केंद्र सरकारने या मार्गावर सेमीहायस्पीड ट्रेन सुरु करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी भूसंपादनाचे काम सुरु होते. परंतु या मार्गात सर्वात मोठा अडथळा जीएमआरटीचा महाकाय दुर्बिणीचा प्रकल्प होता. रेल्वे मार्गामुळे या प्रकल्पावर परिणाम होणार होता. त्यामुळे हा प्रकल्प वगळून नवीन मार्ग करण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला. त्यामुळे पुणे नाशिक रेल्वे मार्गात आता संगमनेर येणार नाही. पुण्यावरुन अहिल्यानगर, शिर्डीमार्गे नाशिककडे असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
जीएमआरटी प्रकल्प यामुळे महत्वाचा
अहमदनगर जिल्ह्यात खोडद (ता. जुन्नर) येथे जीएमआरटीचा महाकाय दुर्बिणीचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प फक्त भारतासाठीच नाही तर २३ देशांसाठी महत्वाचा आहे. या प्रकल्पाचे स्थलांतर करण्यास शास्त्रज्ञांचा विरोध होता. कारण त्यामुळे भारतातील या शक्तीशाली केंद्राची क्षमता कमी झाली असती. यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जीएमआरटी प्रकल्पाला धक्का न लावता पुणे-नाशिक नवीन रेल्वेमार्गाचा नवा आराखडा तयार केला.
शनिवारी रेल्वे मंत्री पुण्यात होते. त्यावेळी त्यांनी याबाबत निर्णय दिला. आता नवीन मार्ग पुणे- अहिल्यानगर- शिर्डी – नाशिक असा असणार आहे. रेल्वेच्या पुणे विभागात अनेक विकास कामे सुरू आहेत. तसेच पुणे ते लोणावळा या तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी यावेळी सांगितले.
असा आहे हा रेल्वे मार्ग
नाशिक पुणे रेल्वे मार्ग सेमीहायस्पीड असणार आहे. एकूण 235 किलोमीटरचा हा मार्ग होता. आता नवीन मार्गामुळे त्याचे अंतर वाढण्याची शक्यता आहे. सेमीहायस्पीड रेल्वे मार्गावर 200 किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वे धावणार आहे. हा संपूर्ण मार्ग सुरुवातीपासून विद्युतीकरण करण्यात येणार आहे. मार्गावर सहा कोचची रेल्वे धावणार आहे. पुणे-नाशिक प्रवास रस्ते मार्गाने सध्या सहा तासांचा आहे. परंतु सेमीहायस्पीड मार्गामुळे हा प्रवास अवघ्या 1 तास 45 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
हे ही वाचा…
वाहतूक कोंडीत पुण्याचे नाव पोहचले जगभरात, मिळवला हा क्रमांक, मुंबईचा क्रमांक वाचून बसेल धक्का