पुणे-नाशिक प्रवास करताना आता ३० मिनिटांची बचत, कोणता आहे नवीन मार्ग
Khed bypass opens : पुणे-नाशिक दरम्यान सेमी हायस्पीड रेल्वे सुरु होण्यास अवकाश आहे. परंतु या दोन्ही शहरातील नागरिकांसाठी चांगली बातमी आहे. त्यांचा प्रवाशांचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार आहे. नवीन मार्ग सुरु झाल्यामुळे हा वेळ कमी होणार आहे.
पुणे : नाशिकहून थेट पुण्याला (Nashik- Pune) सेमी हायस्पीड ट्रेनने (Pune Nashik high Speed Train) जाता येणार आहे. परंतु या प्रकल्पास अजून बराच कालवधी लागणार आहे. सध्या या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम सुरु आहे. त्यामुळे पुणे-नाशिक दरम्यान रस्ते वाहतूक हाच मार्ग आहे. रस्ते वाहतुकीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. त्यांच्यासाठी नवीन मार्ग सुरु झाला असून, त्यामुळे वेळ ३० मिनिटांनी वाचणार आहे.
कोणताही मार्ग झाला सुरु
NHAI ने दोन जिल्ह्यांना जोडणार्या महामार्गालगतचा खेड (राजगुरुनगर) हा नवीन बांधलेला मार्ग सुरु केला आहे. 4.9km लांबीचा बायपास खुला केल्याने पुणे आणि नाशिक दरम्यानचा वेळ किमान 30 मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. पुणे आणि नाशिक दरम्यानचे 212 किमी अंतर साधारणतः साडेचार तासांत कापले जाते. या मार्गावर खेड शहरातून जाणार्या अरुंद रस्त्यामुळे आणि महामार्गालगत राज्य परिवहन बस टर्मिनसमुळे नेहमी वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे हे अंतर कापण्यासाठी दोन्ही बाजूने जाणाऱ्या वाहनांना जास्त वेळ लागतो.
सुरु केले बायपासचे काम
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) ऑक्टोबर 2020 मध्ये खेड बायपासचे काम सुरू केले आणि दोन वर्षांत ते पूर्ण केले. पुणे-नाशिक महामार्गालगत नव्याने बांधण्यात आलेल्या 4.9km खेड (राजगुरुनगर) बायपासमुळे दोन जिल्ह्यांमधला प्रवासाचा वेळ तर कमी होईलच, शिवाय शहरातील लोकांचा प्रवासही सुकर होईल.
पुणे ते नाशिक महामार्गावर अशी काही ठिकाणे आहेत जिथे वाहतूक कोंडी ही बारमाही समस्या आहे. खेड शहर हे त्यापैकी एक होते. नवीन बायपासमुळे या परिस्थितीत बदल होणार आहे.
कसा आहे नवीन मार्ग
नवीन बायपासमध्ये राष्ट्रीय महामार्ग आणि स्थानिक लोकसंख्येच्या वाहतुकीसाठी चार लेन आणि सर्व्हिस रोड आहे. या रस्त्यावरुन रोज सुमारे 30,000 वाहने रस्त्यावरून जातात. आता बायपासमुळे शहरातील वाहतूक कोंडी सुटली असल्याचे खेडवासीयांनी सांगितले.
तोपर्यंत रस्ते वाहतुकीचा पर्याय
पुणे-नाशिक दरम्यान सरळ रेल्वे मार्ग नाही. यामुळे पुण्याहून नाशिकला रेल्वे मार्गाने जाण्यासाठी कल्याण व कल्याणवरुन पुन्हा दुसऱ्या ट्रेनने नाशिक गाठावे लागते. यात सुमारे पाच ते सहा तास जातात. परंतु आता पुणे-नाशिक सरळ रेल्वे मार्ग होणार आहे. परंतु हा मार्ग सुरु होण्यास वेळ लागणार आहे. तोपर्यंत रस्ते वाहतुकीचा पर्याय आहे.
हे ही वाचा
पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातून जाणार सेमी हायस्पीड ट्रेन? पाहा कसा असणार मार्ग