Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपमुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील राड्याची दखल; शहराध्यक्षानाच थेट अजितदादांचा फोन; कार्यकर्ते उद्या सुप्रिया सुळेंना भेटणार

पुण्यात आंदोलनावेळी झालेल्या मारहाणप्रकरणी अजित पवारांनी कार्यकर्त्यांची विचारपूस करण्यात आली तर काही कार्यकर्ते या प्रकरणी उद्या सुप्रिया सुळेंनाही भेटणार असल्याचे सांगण्यात आले.

उपमुख्यमंत्र्यांकडून पुण्यातील राड्याची दखल; शहराध्यक्षानाच थेट अजितदादांचा फोन; कार्यकर्ते उद्या सुप्रिया सुळेंना भेटणार
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी पुण्यात काळे झेंडे दाखवले
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 10:11 PM

पुणेः केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या दौऱ्यावेळी आणि महागाईविरोधात (Against inflation) झालेल्या आंदोलनामुळे (agitation) राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याची घटना घडली. स्मृती इराणी यांना यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडेही दाखवण्यात आले. तसेच शाही फेकण्याचा प्रयत्न करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हा प्रकार बालगंधर्व सभागृहाकडे येताना जंगली महाराज रस्त्यावर घडला आहे. यावेळी राष्ट्रवादीकडून पुण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. त्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुण्यातील राड्याची दखल घेत शहराध्यक्षांनाच थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करुन विचारपूस केली. पुण्यात आंदोलनावेळी झालेल्या मारहाणप्रकरणी अजित पवारांनी कार्यकर्त्यांची विचारपूस करण्यात आली तर काही कार्यकर्ते या प्रकरणी उद्या सुप्रिया सुळेंनाही भेटणार असल्याचे सांगण्यात आले.

महागाईविरोधात जोरदार घोषणाबाजी

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज पुण्याच्या दौऱ्यावर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून महागाईविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. भाजपच्या मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांच्याविरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेस आक्रमक होते आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पुण्यातील बालगंधर्व चौकात 200 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महागाईविरोधात पुकारलेल्या आंदोलनामुले आणि पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आल्याने आंदोलनाला वेगळे वळण लागले. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक होत, त्यांनी जोरदार निदर्शने चालू केली गेली.

स्मृती इराणींच्या ताफ्यावर अंडी फेकण्याचा प्रयत्न

ज्यावेळी राष्ट्रवादीकडून स्मृती इराणी यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले त्यावेळी स्मृती इराणींच्या ताफ्यावर अंडी फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी अंडी फेकणाऱ्या विशाखा गायकवाड या महिलेला पोलिसांनी घेतले.त्यामुळे आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. भाजपकडून सांगण्यात आले की, ज्या हॉटेलमध्ये स्मृती इराणी थांबल्या होत्या, त्या हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे भाजपकडून या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यात आला.

राष्ट्रवादीच्या महिला कार्यर्त्याना मारहाण

हे आंदोलन करत असताना राष्ट्रवादीच्या महिला कार्यर्त्याना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीने आक्रमक होत डेक्कन पोलीस स्टेशन बाहेर राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनीही जोरदार आंदोलन केले. आंदोलनाचा हा गोंधल चालू असतानाच बालगंधर्व सभागृहा बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांच्या मुलाला मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

युवक काँग्रेसकडूनही काळे झेंडे

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुण्याच्या या दौऱ्यावेळी युवक काँग्रेसकडून काळे झेंडेही दाखवण्यात आले. व त्यांचा ताफा अडवण्याचा केला प्रयत्न केला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. यावेळी काळी शाई फेकत घोषणाबाजीही करण्यात आली. हा सगळा प्रकार बालगंधर्व सभागृहाकडे येताना जंगली महाराज रस्त्यावर घडला असून कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचे कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराध्यक्षांना फोन करुन कार्यकर्त्यांची चौकशी केली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उद्या सुप्रिया सुळेंनाही भेटणार असल्याची सांगण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजपाही तक्रार करणार

या आंदोलनावरुन डेक्कन पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजपाही तक्रार करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे ठरवून केलं असल्याचाही आरोप करण्यात येत आहे.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.