Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Accident | 1 ट्रक, 48 वाहनांचा चुराडा Photo!! नवले ब्रिजचा अपघात नेमका कसा घडला?

सोवमारी सकाळी नवले ब्रिजवरील वाहतूक पुर्वपदावर आली आहे. अपघातात नुकसान झालेल्या गाड्या बाजूला काढण्यात आल्या आहेत.

Pune Accident | 1 ट्रक, 48 वाहनांचा चुराडा Photo!! नवले ब्रिजचा अपघात नेमका कसा घडला?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 10:07 AM

पुणेः नवले ब्रीजवर (Navle Bridge) झालेल्या भयंकर अपघाताने (Accident) संपूर्ण पुणे शहर सुन्न झालंय. नियंत्रण सुटलेल्या भरधाव ट्रकने एक, दोन नाही तर तब्बल 48 वाहानांना चिरडलं. यात चारचाकी वाहनांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. अपघातासाठी धोकादायक स्पॉट  मानला जाणाऱ्या नवले ब्रीजने अनुभवलेली ही घटना अत्यंत भीषण होती. प्रत्यक्षदर्शी आणि ज्या वाहनांचा अपघात झाला, त्यातील चालकांनी दिलेल्या प्रतिक्रियांवरून अपघात नेमका कसा झाला, हे पुढे आले आहे.

घटना कुठे घडली?

मुंबई-बंगळुरू हायवेवर नवले ब्रीज परिसरात ही घटना घडली. आंध्र प्रदेशमधील पासिंग असलेला एक ट्रक रविवारी रात्री साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. नवले ब्रीज परिसरातील दरी पूल पार केल्यानंतर ट्रक नवले ब्रीजच्या उतारावर आला आणि त्याचं नियंत्रण सुटलं.

Pune

काय घडलं नेमकं?

एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठ ते सव्वा आठची वेळ होती. नवले ब्रीजवर नेहमीप्रमाणे प्रचंड ट्रॅफिक होती. त्यामुळे बराच वेळ गाड्या थांबलेल्या होत्या. एवढ्यात मागून भरधाव वेगाने येणारा ट्रक समोर येईल त्या वाहनांना धडका देत निघाला…

एका गाडीचे चालक पांडुरंग यांनी बीबीसीला सदर माहिती दिली. ते म्हणाले, मी आठ वाजेच्या सुमारास नवले ब्रीज वर होतो. समोर प्रचंड ट्रॅफिक होती. जवळपास अर्धा तास गाडी जागेवारून हलणार नाही अशी. मी गाडी थांबवली. दहाच सेकंदात मागून मोठ-मोठे आवाज येऊ लागले. पाहिलं तर एक ट्रक गाड्या ठोकत येत होता.

माझ्या मागे 15-20 गाड्या ठोकल्या, माझ्याही गाडीत प्रवासी होते. पण मी तिथेच थांबलो. गाडी बाजूला घेतली. त्यामुळे मी आणि प्रवासी सगळेच वाचले. माझ्या गाडीतल्या कुणालाही दुखापत झाली नाही. त्यानंतर हा ट्रक तितक्याच वेगाने पुढे निघाला. अनेक गाड्यांना आणखी धडका दिल्या. त्यामुळे इतरही गाड्या एकमेकांवर आदळल्या…. असं पांडुरंग यांनी सांगितलं.

पुण्याचे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांनीही अपघाताची प्राथमिक माहिती दिली. ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक ब्रीजवरून वेगाने खाली आला, असा अंदाज वर्तवण्यात येतोय.

वाहनांत अनेक लोक अडकले

अपघात ग्रस्त वाहनांत अनेक चालक अडकून पडल्यामुळे गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळावरून एकामागून एक वाहनं बाजूला काढण्यास सुरुवात झाली. तसेच गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक वर्षांपासून या परिसरात राहणाऱ्या लोकांनी अपघाताची भीषणता वर्णन केली. आतापर्यंत एवढा भयंकर अपघात कधी पाहिला नव्हता, अशी प्रतिक्रिया एकाने दिली.

पाहा आज सकाळची दृश्य-

अॅक्सिडेंट झोन?

साताऱ्याकडून मुंबईकडे जाताना नवले ब्रीज चौक, भुमकर नगर ही ठिकाणं अपघातांसाठी कुख्यात आहेत. रविवारच्या घटनेत नवीन कात्रज बोगदा ओलांडल्यानंतर ट्रक चालकाने गाडी न्यूट्रलवर टाकल्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज वर्तवला जातोय.

या घटनेनंतर सोमवारी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाची महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील कुणाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

सोवमारी सकाळी नवले ब्रिजवरील वाहतूक पुर्वपदावर आली आहे. अपघातात नुकसान झालेल्या गाड्या बाजूला काढण्यात आल्या आहेत. अपघातात एकूण 48 गाड्यांचा अपघात झाला तर 10 जणांवर उपचार सुरू आहेत.

हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात
हींजवडी टेम्पो ट्रॅव्हल आग प्रकरण अपघात नाही घातपात.
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
नागपूर हिंसाचाराच्या आधी काय प्लॅनिंग झालं? सीसीटीव्ही फुटेज आलं समोर.
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?
2 भागातली संचारबंदी काढली, 3 ठिकाणी शिथिलता; काय आहे नागपूरची स्थिती?.
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले
लाडक्या बहिणींच्या पैशांवर अजित पवार स्पष्टच बोलेले.
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा
'सरड्यालाही लाज वाटेल इतका वेगानं रंग बदलला', परबांचा कायंदेंवर निशाणा.
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान
'.. तर मग मात्र पंचाईत होईल'; सालियान प्रकरणावर उद्धव ठाकरेंचं विधान.
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू,शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा.
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी.
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.