पुणे महापालिकेकडे 1.50 रुपयांची सिरींज नसणं दुर्दैव, सत्ताधाऱ्यांचा भोंगळ कारभार सुरु, प्रशांत जगताप यांचा आरोप

राज्यातील मोठ्या महानगरपालिकांपैकी एक महापालिका असणाऱ्या अ दर्जाच्या पुणे महापालिकेकडे 1.50 रुपयांची सिरींज नसावी यापेक्षा दुर्दैव काय असावं ?, असा सवाल प्रशांत जगताप यांनी केला आहे.

पुणे महापालिकेकडे 1.50 रुपयांची सिरींज नसणं दुर्दैव, सत्ताधाऱ्यांचा भोंगळ कारभार सुरु, प्रशांत जगताप यांचा आरोप
प्रशांत जगताप
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 7:04 PM

पुणे: कोरोना लसीकरण सिरींज अभावी रखडल्याचा प्रकार पुण्यात घडल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी कोरोना लसी उपलब्ध होऊन केवळ सिरींज अभावी लसीकरण रखडणं ही पालिकेचा भोंगळ कारभार दाखवणारी घटना आहे, असं म्हटलंय. राज्यातील मोठ्या महानगरपालिकांपैकी एक महापालिका असणाऱ्या अ दर्जाच्या पुणे महापालिकेकडे 1.50 रुपयांची सिरींज नसावी यापेक्षा दुर्दैव काय असावं ?, असा सवाल प्रशांत जगताप यांनी केला आहे.

पुणे अ दर्जाची महापालिका, जिचं बजेट 8 हजार कोटी आहे,भौगोलिकदृष्ट्या महापालिका मोठी आहे, आज तिच्याकडे सिरींज नसावी. त्या अभावी लसीकरण बंद पडणं निश्चित पुण्यातील सत्ताधाऱ्यांना शोभणारं नाही. पालिकेत सत्ताधारी असणाऱ्या महापौर, चेअरमन, आणि सभागृह नेत्यांना याची कल्पना नव्हती का ?, असा सवाल जगताप यांनी केलाय.

सत्ताधारी भाजपनं कोणतंच चांगलं कामं केलं नाही

पुण्यातील सत्ताधारी भाजपनं गेल्या साडे चार वर्षात कोणतंही चांगलं काम केलंलं नाही. येत्या काळात पुणेकर यांना चांगली सुबुद्धी देतील, असं प्रशांत जगताप म्हणाले आहेत. आतापर्यंत कोणतचं चांगलं काम यांनी केलेलं नाही. पुणेकर यांना चार महिन्यात बदलून दाखवतील, असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.

पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार

पुण्यातील सत्ताधारी भाजपकडून सगळा भोंगळ कारभार सुरु आहे. आम्ही पुण्यात सेल्फी विथ खड्डे ही स्पर्धा घेतली होती. ही बाब पुणेकरांना कळू नये म्हणून घाई घाईनं खड्डे बूजवायला सुरुवात केली. शहरात सगळीकडे यांच दुर्लक्ष आहे अ दर्जाच्या महापालिकेचा सगळा भोंगळ कारभार चाललाय,असा आरोप जगताप यांनी केलाय.

मनसे भाजप युतीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुणे दौरे वाढलेले आहेत. मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी भाजपसोबत युती करण्याची मागणी केलीय. तर, राज ठाकरे यांनी भाजप सोबत युतीच्या चर्चा थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रशांत जगताप यांनी त्यांची भूमिका मांडली. मनसे आणि भाजपा युती झाली तरी त्याचा फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसलाच होणार असल्याचं ते म्हणाले.

युतीच्या चर्चा थांबवा, राज ठाकरेंचे आदेश

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभार रचना जाहीर होताच प्रत्येक पक्षानं आतापासूनच कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेनंतर संपूर्ण राज्याचं लक्ष हे पुणे महापालिकेकडे लागलं आहे. यंदा पुण्यात भाजपा आणि मनसे युती करावी अशी चर्चा मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यावरूनच पुण्यात सत्ताधारी भाजपा आणि मनसे एकत्र निवडणूक लढवतील. तशी विनंती आम्ही राज ठाकरे यांच्याकडे करु असं मनसे पदाधिकारी सांगत होते. असं असतानाच राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तुर्तास तरी युतीच्या चर्चा थांबवा. वेळ बघून निर्णय घेऊ, असं सांगत पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर येण्याचं नियोजन केलं आहे. शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर असणार आहेत.

इतर बातम्या:

संजय राऊतांपेक्षा आदित्य ठाकरेंना गोव्याची जास्त माहिती, नितेश राणे यांचा टोला

पुण्यात साकारला जातोय शरद पवारांचा पुतळा, सुप्रिया सुळेंकडून शिल्पकाराचं कौतुक

Pune NCP leader Prashant Jagtap slam Pune Municipal Corporation and BJP for stop corona vaccination lack of syringe

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.