पुणे राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी केली मोठी घोषणा, फेसबुक लाईव्ह करत केला निर्णय जाहीर
Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला जात आहे. परंतु काही आमदार तटस्थ राहिले आहेत. आता हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी मोठी घोषणा केलीय.
योगेस बोरसे, पुणे | 17 जुलै 2023 : राज्यातील राजकारणात गेल्या पंधरा दिवसांपासून मोठे बदल झालेत. राष्ट्रवादी काँग्रेसपासून अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला. त्यानंतर अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळांसह नऊ जणांना मंत्रिपद मिळाले. अजित पवार यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर १७ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरु झाले. हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे यांनी अद्यापही स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांनी आता रुग्णालयातून फेसबुक लाईव्ह करत घोषणा केली.
कशी बदलली तुपे यांनी भूमिका
हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी अजित पवार यांच्या बंडानंतर आपली भूमिका दोन वेळा बदलली. शरद पवार यांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहुन तुपे यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला होता. मात्र त्यानंतर अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रांकडून दिली होती. त्यामुळे ते द्विधा मनस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले. चेतन तुपे यांनी अजित पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केल्यास मनसे नेते वसंत मोरे यांची शरद पवार गटात एन्ट्री होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली. तसे झाल्यास तुपे यांनी २०२४ ची निवडणूक अवघड जाणार आहे.
आता काय केला निर्णय जाहीर
आमदार चेतन तुपे रुग्णालयात दाखल झाले आहे. प्रकृती बरी नसल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले आहे. या ठिकाणावरुन त्यांनी फेसबुक लाईव्ह केला. त्यात आपण पावसाळी अधिवेशनाला गैरहजर राहणार असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. प्रकृती ठीक नसल्यामुळे अधिवेनशाला जाणार नसल्याची तुपे यांनी म्हटले आहे.
काय म्हटले आमदार तुपे यांनी
अधिवेशात विविध आंदोलन करुन जनतेच्या प्रश्नावर आपण नेहमी आवाज उठवला आहे. सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी विविध आयुधांचा वापर केला आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत लोकांचे प्रश्न मांडले आहे. परंतु प्रकृती बरी नाही. मी मनापासून अधिवेशन मिस करत आहे. अधिवेशनाचे काही दिवस आजारपणामुळे माझे बुडणार आहे. परंतु लवकर बरे होऊन अधिवेशनाला जाईल. पुढील काळात दुप्पट काम करेल, अन् जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवेल, असे आमदार चेतन तुपे यांनी म्हटले.