Loksabha Election 2024 : लोकसभेला आमच्या ‘इतक्या’ जागा निवडून येतील; चंद्रशेखर बावनकुळे यांनी आकडा सांगितला

Chandrashekhar Bawankule on Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणूक अन् नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व; चंद्रशेखर बावनकुळे यांची सविस्तर प्रतिक्रिया. चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोपीचंद पडळकर यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांची माफी मागितली आहे.

Loksabha Election 2024 : लोकसभेला आमच्या 'इतक्या' जागा निवडून येतील; चंद्रशेखर बावनकुळे यांनी आकडा सांगितला
Image Credit source: चंद्रशेखर बावनकुळे फेसबुक
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 3:56 PM

पुणे | 21 सप्टेंबर 2023 : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज पुणे दौऱ्यावर आहेत. बावनकुळेंच्या उपस्थितीत आज भाजपच्या नवीन शहर कार्यकारणीची बैठक झाली. शिवाय बावनकुळे आज शहरातील प्रमुख गणेश मंडळांना देखील भेटी त्यांनी भेटी दिल्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचं पुणे शहर आणि जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. त्यांच्या उपस्थितीत पुणे शहर भाजप कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला पुणे शहर भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीला भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. निवडणुकीत आपल्याला यश मिळेल, असा दावा सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात येत आहे. भाजपकडूनही पुन्हा जिंकून येण्याचा विश्वास व्यक्त केला जातोय. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर थेट आकडाच सांगितला आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला भव्य विजय मिळेल, असं ते म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकास करतोय. आगामी निवडणुकीत महायुतीला 45 जागांवर यश मिळेल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

इंडियाने पत्रकारांवरच बहिष्कार घातला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत पत्रकार ही एनडीएच्या बाजूनेच मतदान करतील. मोदींचं नेतृत्व तुम्हाला ही मान्य असेल. काँग्रेस जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करत आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे. सगळीकडे त्यांना मान आणि महत्व आहे. पंतप्रधान मोदी कधीही चुकीचं निर्णय घेणार नाहीत, असं म्हणत बावनकुळे यांनी इंडियाआघाडीवर टीकास्त्र डागलंय.

गोपीचंद पडळकर जे बोलले ते संस्कार आणि संस्कृतीला सोडून आहे. भाजप याला कधीच पाठीशी घालणार नाही. कुणाशीही कितीही मनभेद असेल तर असं केलं नाही पाहिजे. आमच्या संस्कृतीत ते नाही. मी पण दिलगिरी व्यक्त करतो. अजित दादांना विनंती करत की त्यांना ही मोठ्या मनाने त्यांना माफ करावं. पडळकरांना मी स्वत : सांगितला आहे kr, अशी विधानं करू नयेत. ते एक जबाबदार आमदार आहेत. भाजप कधीही विरोधात असो की आता कुठल्याही नेत्याबद्दल असंस्कर विधाने केली नाहीत. अजितदादांचं मन दुखावलं असेल तर मी स्वतः माफी मागतो, असं बावनकुळे म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.