Pune News : खडकवासला धरणामध्ये बुडालेल्या मुली पुण्याच्या नव्हत्याचं, नेमंक काय घडलेलं?, समोर आली मोठी माहिती!

Pune Sanjay Matale News : गावात सावडण्याच्या विधीला सर्वजण चालले होते. तितक्यात वाचवा वाचवा अशा आरोळ्या कानावर पडल्या. त्याचक्षणी गावातील शेतकरी थेट पाण्याकडे गेला आणि एक दोन नाहीतर पाच मुलीसांठी देवदूत बनला.

Pune News : खडकवासला धरणामध्ये बुडालेल्या मुली पुण्याच्या नव्हत्याचं, नेमंक काय घडलेलं?, समोर आली मोठी माहिती!
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 5:40 PM

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणामध्ये आज सोमवारी दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. बातमी वाऱ्यासारखी पसरली खरी  पण दोनच्या जागी आकडा आणखी दिसला असता. फक्त एका शेतकऱ्याच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना सिंहगड जवळील गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत घडली आहे. गोऱ्हे खुर्द गावामधील शेतकरी संजय सिताराम माताळे यांनी आपल्या जिवाची पर्वा न करत पाण्यात उडी घेत देवदूताप्रमाणे बुडत असलेल्या मुलींच्या मदतीसाठी धावून गेले.

नेमकं काय घडलं? 

गोऱ्हे गावामध्ये कामानिमित्त बुलडाणामधील कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्या घरामध्ये काही कार्यक्रम असल्याने पाहुणे मंडळी आले होते. सकाळी पोहण्यासाठी घरातील लहान मुलींना हट्ट केला. त्यानंतर घरातील एक महिला आणि लाहन सहा मुली पोहायला गेल्या. कोणालाही पोहता येत नसल्याने सुरूवातीला काठावर असलेल्या मुली पाण्यात गेल्या मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्या नाकातोंडात पाणी भरल्यावर त्या बुडू लागल्या. इतर बाजूला पोहत असलेल्या मुलीही घाबरल्या पाण्यामध्ये प्रवाहामुळे त्या आत खेचल्या गेल्या आणि त्यांचाही जीव धोक्यात आला.

मुली बुडू लागल्यावर महिलेने आरडाओरडा सुरू केला. त्याच दिवशी गावामध्ये सावडण्याच्या विधीला बरेच लोक जमले होते. ग्रामस्थ संजय माताळे हे सुद्धा विधीसाठी जात असताना त्यांना आवाज आल्यावर त्यांनी लगोलग वेळ न दवडता पाण्याकडे धाव घेतली.

संजय यांनी पाण्यातून बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मुलींना बाहेल काठावर आणलं. एक-एक करत त्यांनी पाच जणींना वाचवलं, काठावर असलेल्या ग्रामस्थांनी नाकातोंडातून आत गेलेलं पाणी बाहेर काढलं. त्यानंतर खानापूरमध्ये उपचारासाठी या सर्वांना दवाखान्यात हलवलं. या पाचही मुली वाचल्या पण सुरूवातीला आतमध्ये गेलेल्या दोघींना संजय माताळे वाचवू शकले नाहीत.

दरम्यान, संजय माताळे यांनी दाखवलेल्या धाडसाची पंचकृषीत चर्चा आहे. त्यांना मित्रं-मंडळी, नातेवाईक फोन करून त्यांचं कौतुक करत आहेत. संजय यांच्या धाडसाने पाचही मुलींचे प्राण वाचले आहेत. आता अनेकवेळा आपण पाहतो की लोक अपघात किंवा काही घटना घडल्यावर मदत करण्याआधी त्याचा व्हिडीओ किंवा फोटो घेतात आणि त्यातून वेळ मिळाला तर मदत करतात. अशांसाठी संजय माताळे चांगलं उदाहरण ठरले आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.