AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : गौतमी पाटीलच्या ‘अदा’कारीने जिंकली मने, तरुण, तरुणींसोबत लहान मुलेही थिरकले

gautami patil : गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमांना मोठी मागणी असते. तिच्या डान्सने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. यामुळे वर्षभराच्या तारखा बुक असल्याची चर्चा सर्वत्र असते. पिंपरी चिंचवडमध्ये तिचा कार्यक्रम झाला. यावेळी लहान मुलांनीही ठेका धरला.

Video : गौतमी पाटीलच्या ‘अदा’कारीने जिंकली मने, तरुण, तरुणींसोबत लहान मुलेही थिरकले
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 11:32 AM

रणजित जाधव , पिंपरी चिंचवड : गौतमी पाटीलच्या डान्सने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. गौतमी पाटीलच्या डान्सचे व्हिडीओ Youtube, instagram, facebook वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने तिच्या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. तिच्या लावणी आणि तिच्या डान्समधील वेगवेगळ्या अदांमुळे खूप प्रसिद्ध झाली आहे. तरुण, तरुणी तिच्या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी करतात. काही कार्यक्रमांमध्ये गोंधळ यामुळे झाल्याचे प्रकार घडला. परंतु पिंपरी चिंचवडमध्ये गौतमी पाटील हिचा कार्यक्रम गोंधळाविना पार पडला. यावेळी तरुण, तरुणीसोबत लहान मुलांनीही ठेका धरला.

पुण्यात जोरदार कार्यक्रम

हे सुद्धा वाचा

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला हजारो तरुणांची गर्दी होतेय. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने पिंपरी- चिंचवडकरांची मने जिंकली. पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी येथे अमित लांडे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त तिच्या नृत्याच्या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होतं. तिने काही गाण्यांवर नृत्य करत उपस्थित महिला, तरुण -तरुणीची मने जिंकत मनोरंजन केलं. यावेळी कार्यक्रमाला आलेल्या लहान मुलांनाही नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही.

गोंधळाविना पार पडला कार्यक्रम

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी होणार होती. यामुळे यावेळी पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला. खासगी सुरक्षारक्षकही होते. यामुळे गौतमी पाटील हिचा कार्यक्रमात कोणताही गोंधळ झाला नाही. सर्व जणांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.

वर्षभराच्या तारखा बुक?

गौतमी पाटील हिच्या वर्षभराच्या तारखाही बुक झाल्या आहेत. तिच्या कार्यक्रमांना विविध ठिकाणी मोठी मागणी असते. आता तिला लग्न केव्हा करणार? हा प्रश्नही विचारला जातो. त्यावर गौतमी पाटील म्हणते, “अजून लवकर लग्न करणार नाही. कारण आताच सुरुवात झालीय. एवढ्या लवकर लग्न करणार नाही. ज्यावेळेस लग्न ठरेल आणि करायचा विचार करेन त्यावेळी तुम्हाला नक्की सांगेन”, अशी प्रतिक्रिया गौतमीने दिली.

गौतमी पाटील कार्यक्रमासाठी किती रुपये घेते याच्याही चर्चा होत असतात. गौतमी पाटील तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये घेते. आम्ही फक्त 5 हजार रुपये वाढवून मागितले तर बाजार मांडल्याचा आरोप होतो, असे इंदूरीकर महाराज म्हणाले होते. त्यावर गौतमी पाटीलने जोरदार उत्तर दिले होते. ती म्हणाली होती की, मी काय बोलणार त्यांच्याविषयी. फक्त गैरसमज नका करू. महाराजांचा गैरसमज झाला आहे. ते सांगतात तेवढं मानधन नाही. हे प्रेक्षकांनी ही ध्यानात घ्यावं. मी तिन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केले नसते. आमच्या टीममद्ये 11 मुली असतात. एकूण 20 जणांची आमची टीम आहे. या सर्वांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे मानधन आम्ही घेतो. पण महाराज सांगतात तेवढं घेत नाही. आणि तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये कोणीही देणार नाही, असं गौतमी पाटील म्हणाले.