Navratri 2023 : नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात; जेजुरीगडावर भाविकांची गर्दी
Navratri 2023 : नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त जेजुरीगडावर सजावट करण्यात आली आहे. तसंच भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळतेय. पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नीरा नदीच्या काठावरील माता लक्ष्मी मंदिरात घटस्थापनेने नवरात्र उत्सवात प्रारंभ करण्यात आला. वाचा सविस्तर...
जेजुरी , पुणे | 15 ऑक्टोबर 2023 : आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळतोय. अशातच राज्यातील मंदिरंही सजली आहेत. जेजुरीतील खंडोबाच्या जेजुरी गडावरील शारदीय नवरात्र उत्सवात प्रारंभ झाला आहे. राज्याच्या धर्मादाय आयुक्तांच्या हस्ते करण्यात घटस्थापना आली आहे. दर्शनासाठी भाविक जेजुरीत दाखल झालेत. आजपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे. नवरात्र उत्सव यानिमित्ताने मंदिराला विविध रंगाच्या फुलमाळांनी सजावट करण्यात आली आहे. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. देवीचा अन् स्त्री शक्तीचा जागर केला जात आहे.
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पुण्यातील महालक्ष्मी देवीच मंदिर सजलं आहे. सकाळपासून दर्शनासाठी भक्तांची मंदिरात गर्दी पाहायला मिळतेय. परंपरेनुसार देवीची घटस्थापना संपन्न झाली आहे. यंदा महालक्ष्मी मंदिराला गोल्डन टेम्पलचा देखावा साकारण्यात आला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीची विधिवत पूजा देखील संपन्न झाली. यंदा महालक्ष्मी मंदिर दर्शन पुण्यातील महत्त्वाच्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे. पुणे मेट्रोच्या सर्व महिला अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मंदिर प्रशासनाच्या वतीने उद्या सन्मान होणार आहे.
आजपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालाय. साडे तीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या वणीच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी पाहायला मिळतेय. संस्थानचे अध्यक्ष मुख्य न्यायाधीश यांच्या हस्ते दागिने आणि पादुका पूजन संपन्न झालं. पारंपारिक वाद्य वाजवत थोड्याच वेळात देवीची मिरवणूक निघणारआहे. सप्तशृंगी देवीच्या मूर्तीला आभूषणे आणि वस्त्र परिधान करण्यात आले. मंदिर संस्थानचे अध्यक्ष मुख्य न्यायाधीश बी. जी. वाघ यांच्या हस्ते देवीची आरती सुरू आहे.
हेमाडपंथी बांधकाम असलेल्या खेड तालुक्यातील कनेरसर येथील कुलदैवत यमाई देवी मंदिरात आज घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. यावेळी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने देशभरातील भाविक भक्त येथे येत आहेत नवरात्री मध्ये देवीचा मोठा उत्सव भरतोय. नवरात्र उत्सव यानिमित्ताने मंदिराला विविध रंगाच्या फुलमाळांनी सजावट करत विद्युत रोषणाई करण्यात आली. यावेळी देवीला दागदागिण्यानी सजावट करण्यात आलीय. त्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण पहायला मिळत असुन माहूरगडावरील साडे तीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ असलेल्या श्री रेणुका देवी म्हणजे यमाई देवी थोर संत कान्होराज पाठक यांनी त्यांच्या भक्तीने कनेरसर गावी आणली आणिरेणुका देवीची यमाई माता झाली,अशी आख्यायिका सांगितली जाते.