Rohit Pawar : हे सगळे आता…; पुतण्याचा काकाला टोला, काय म्हणाले रोहित पवार?
Rohit Pawar : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. रोहित पवार यांनी नेमकं काय म्हटलंय? युवकांच्या प्रश्नांवरूनही रोहित पवार आक्रमक झाले आहेत. युवकांच्या प्रश्नांना घेऊन ते पदयात्रा काढत आहेत. वाचा सविस्तर...
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे | 09 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. आम्ही युवकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरत आहोत. ही यात्रा संपल्यानंतर ज्यांनी ज्यांनी युवा धोरणाला विरोध केला आहे. ते सगळे आता आजारी पडतील, असा टोला रोहित पवार यांनी अजित पवार यांना लगावला आहे. काही दिवसांआधी अजित पवार आजारी असल्याच्या बातम्या समोर आल्या. यावेळी अजित पवार नाराज असल्याचीही चर्चा राजकीय वर्तूळात झाली. यावरून रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
शरद पवारसाहेबांना फार जवळून बघतोय. त्यामुळे टिप्स घेतल्या पाहिजेत, असं नाही. प्रवास पाहिलं तरी खूप त्यातून प्रेरणा मिळते. काही लोक पवारसाहेब यांच्याकडून टिप्स घेऊन सुद्धा विचारशी एकमत राहिले नाहीत. जवळ राहिले नाहीत. विचाराला पक्के राहिले नाहीत. पवारसाहेबांच्या विचाराला दगा दिला. मात्र आम्ही तसं करणार नाही, आम्ही कायम साहेबांसोबत आहोत, असं रोहित पवार म्हणाले.
प्रत्येक दिवाळी पवार कुटुंबियांना भेटायला येत असतात. दिवाळीला पण आता यंदा आम्ही रस्त्यावर दिवाळी साजरी करणार अस म्हणलं तरी चालेल. सुनावणी सुरूच राहणार आहे. सामान्य लोकांना ही चर्चा नकोय. त्याचे मुद्दे मांडणारे कोणी हवं आहे. चर्चा फक्त मुख्यमंत्री नेते आणि इतर चर्चा यावरच सुरू आहे. या माध्यमातून आवाहन सगळ्यांनाच आहे. ज्यांनी स्वतःच्या स्वार्थसाठी विचार सोडून गेले. त्यांना एक सांगणं आहे. लोकांच्या हिताचं आणि लोकांसाठी बोला, असं रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार हे युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. २५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत ही यात्रा चालणार आहे. याबाबत रोहित पवारांनी माहिती दिली. येत्या 24 तारखेला महात्मा फुले वाडा आणि लाल महालात जाऊन आशीर्वाद घेणार आहोत. एकुण 10 जिल्हे आणि 28 तालुक्यातून ही यात्रा जाणार आहे. पुणे ,अहमदनगर, बीड ,जालना ,परभणी, हिंगोली, वाशिम , अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूरमधून ही यात्रा जाईल. दिवसाला 18 ते 24 किमी चालणार आहोत. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने समारोप सभा होणार आहे. पुण्यात शरद पवार साहेबांची सभा घेणार आहेत. तेव्हा शरद पवारसाहेब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील, असं रोहित पवार म्हणाले.