पुण्याच्या ग्रामीण भागातही लागू होणार नाईट कर्फ्यू? जिल्हाधिकारी घेणार मोठा निर्णय

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संचारबंदी लागू करायची की नाही, याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे बुधवारी घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पुण्याच्या ग्रामीण भागातही लागू होणार नाईट कर्फ्यू? जिल्हाधिकारी घेणार मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 8:19 AM

पुणे : राज्यात कोरोनाचा (Corona) धोका कमी होताच सर्व काही पुन्हा सुरू झालं होतं. पण कोरोनाने आणखी रौद्र रुप घेतल्याचं समोर आलं आहे. ब्रिटनमध्ये (britain)आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार पुणे (Pune) शहरामध्येही मंगळवारी रात्रीपासून संचारबंदी (night curfew) लागू करण्यात आली. परंतू जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संचारबंदी लागू करायची की नाही, याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख हे बुधवारी घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण अशात पुणेकरांनी काळजी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. (pune night curfew update new corona strikes in britain pune airport rules news update)

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार केलेल्या कृती दलाच्या अधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक होणार असून यामध्ये संचारबंदीविषयी चर्चा केली जाणार आहे. या बैठकीमध्ये करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान, कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे खबरदारी म्हणून पुणे महापालिकेनेही काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.

युरोप तसंच दुबईतून मायदेशी परतणाऱ्या सर्व प्रवाश्यांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक असणार आहे. इतकंच नाही तर 7 दिवस हॉटेल त्यानंतर 7 दिवस होम क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. त्या बाबतच्या मार्गदर्शक नियमावलींचा आदेश पुणे महापालिका प्रशासनाच्यावतीने जाहिर करण्यात आला आहे.

काय आहे नियमावली?

– पुणे विमानतळावर युरोपातील देशांमधून तसेच मध्य पूर्व देशांसह दुबईतून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर स्वॅब टेस्ट रिपोर्ट बंधनकारक असणार आहे.

– ज्यांच्याकडे रिपोर्ट नसेल त्यांना टेस्ट करावी लागणार

– त्यामध्ये कोरोनाग्रस्त आढळल्यास नायडू सांसर्गिक रुग्णालयात दाखल केले जाणार

– तसेच चाचणी निगटिव्ह जरी आली तरी 7 दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन होणे बंधनकारक असेल

– त्यानंतर 5 ते 7 दिवस होम क्वारंटाईन देखील व्हावं लागणार

– यावेळी प्रवाश्यांना पीएमपीएमएलच्या बसमधून हॉटेलपर्यंत नेण्यात येणार

– सर्वांचे पासपोर्ट ताब्यात घेऊन डिस्चार्जच्या वेळी ज्या त्या व्यक्तींना पासपोर्ट पुन्हा दिले जातील

– यासोबतच ज्या प्रवाश्यांनी गेल्या 15 दिवसांमध्ये लंडन शहराला भेट दिली, प्रवास केला, त्यांनादेखील क्वारंटाईन व्हावं, असे प्रशासनाकडून आवाहन (pune night curfew update new corona strikes in britain pune airport rules news update)

इतर बातम्या –

ब्रिटनच्या कोरोनाचा धसका, ठाणे पोलिस आयुक्त अ‌ॅक्शन मोड, शहरात कडक संचारबंदीसह वाहनांची कसून तपासणी

पुण्यात आणखी एक गवा, पण येतायत कुठून?

(pune night curfew update new corona strikes in britain pune airport rules news update)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.