सातव्यांदा पवारांना भेटलो आता…; कराळे गुरूजींचं लोकसभेच्या उमेदवारीवर स्पष्ट भाष्य

Nitesh Karale on Meeting with Sharad Pawar Loksabha Election 2024 : नितेश कराळे गुरुजी लोकसभा लढणार की नाही?; शरद पवारांना भेटल्यानंतर काय म्हणाले? राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार का? नितेश कराळे यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर.....

सातव्यांदा पवारांना भेटलो आता...; कराळे गुरूजींचं लोकसभेच्या उमेदवारीवर स्पष्ट भाष्य
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 12:28 PM

नितेश कराळे गुरुजी आज पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. मागील आठवड्यात कराळे गुरुजी यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. वर्धा लोकसभा जागेसाठी कराळे गुरुजी इच्छुक आहेत. शरद पवार यांनी जर आदेश दिला तर ही निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया कराळे गुरुजी यांनी मागच्या आठवड्यात दिली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा पुण्यात ही भेट झाली. या भेटीनंतर नितेश कराळे गुरुजी यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचा निर्धार नितेश कराळे गुरुजी यांनी व्यक्त केला.

शरद पवारांसोबतच्या भेटीवर कराळे गुरूजी म्हणाले…

शरद पवारांसोबत आज सातवी भेट झाली. शरद पवारांनी काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. लोकसभा निवडणूक आणि उमेदवारीबाबत 26 किंवा 27 तारखेला अंतिम निर्णय होईल. अमर काळे तयारी लागले आहेत त्यांच्या उमेदवारी बाबत अंतिम निर्णय नाही. आधी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार आहे आणि नंतर उमेदवारी मागणार आहे, असं नितेश कराळे यावेळी म्हणाले.

विद्यमान खासदारांनी…; कराळेंचा आरोप काय?

मी एकनिष्ठ राहणार असा शब्द दिला आहे. महाविकास आघाडीचं काम करतोय कोणत्याही आमदार खासदार यांच्याविरोधात बोलत नाही. वर्धा लोकसभेत 3 ते 3.5 लाख मत आहेत ती आपल्याला मिळू शकतात. विद्यमान खासदारांनी 10 वर्षात विकासकामं केली नाहीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत नाहीत, असा आरोप नितेश कराळे म्हणाले.

मी निवडणूक लढणार आणि निवडून येणारच- नितेश कराळे

तुतारी घेऊन संसदेत पक्षाचा आवाज बुलंद करेन असं शरद पवारांना सांगितलं. जे महाराष्ट्रातील नेते करत करत नाहीत ते मी करतोय. लोकांच्या हितासाठी मी लढतो आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न मला माहिती आहेत. या प्रश्नांना लोकसभेत मांडणं अन् ते प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. त्यासाठी मी उमेदवारी मागतो आहे. शरद पवारांनी ही उमेदवारी दिली तर मी निश्चित लढणार आणि निवडूनही येणार आहे, असं कराळे गुरुजी म्हणाले.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.