pune gas cyclinder blast | पुणे गॅस सिलेंडर स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, तिघांना अटक

pune gas cyclinder blast | पिंपरी, चिंचवड शहरात गॅस चोरीची काळाबाजार सुरू होता. रविवारी मध्यरात्री एकामागे एक नऊ ते दहा सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात मोठा हादरा बसला. वाहने जळून खाक झाली.

pune gas cyclinder blast | पुणे गॅस सिलेंडर स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, तिघांना अटक
Image Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 12:04 PM

रणजित जाधव, पुणे | 9 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरातील पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी मध्यरात्री एकापाठोपाठ नऊ ते दहा सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट टँकरमधून गॅस भरला जात असताना झाला. त्यानंतर घटनास्थळावरुन वाहन चालक आणि गॅस भरणारे फरार झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपासासाठी पथक तयार केले गेले. या पथकाने तीन जणांना अटक केली आहे. मात्र अजून टँकरचालक फरार आहे. वाकड पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

गॅस चोरी प्रकरणात काही तासांत कारवाई

पुणे येथील ससून रुग्णालयातील आरोपी फरार प्रकरणात पुणे पोलिसांवर टीका होत आहे. ललित पाटील हा रुग्णालयातून पळून गेल्याच्या घटनेस आठ ते दहा दिवस झाले आहे. परंतु अजूनही तो पोलिसांना सापडत नाही. आता पिंपरी चिंचवडमध्ये गॅस चोरी प्रकरण उघड झाले आहे. यामुळे पोलिसांवर पुन्हा टीका होऊ लागली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी घटनेच्या काही तासांत तीन जणांना अटक केली आहे.

गॅस टँकरचा चालक अजूनही फरार

पिंपरी चिंचवडमधील जेएसपीएम संस्थेजवळ गॅस चोरीचा काळाबाजार होत असल्याची घटना उघड झाली. त्यामुळे रविवारी मध्यरात्री एकामागे एक सिलेंडर स्फोट होऊन भीषण आग लागली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असली तरी टँकर चालक अजूनही फरार आहे. मात्र टँकर पार्क करण्यासाठी जागा देणारा मालक, चोरीच्या गॅसची विक्री करणारा आणि अवैधरित्या सिलिंडरची वाहतूक करणारा टेम्पो चालकाचा यात समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

तानाजी सावंत यांची पोलिसांवर टीका

पुणे येथील गॅस टँकर प्रकरणात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पोलिसांना घेरले आहे. गॅस माफियांचा हा हैदोस ससूनमधील ड्रग्स माफियांसारखाच आहे, असा आरोप त्यांनी केला. गॅसच्या या काळाबाजाराला आणि त्यामुळे लागलेल्या भीषण आगीला पिंपरी चिंचवड पोलिसच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप सावंत यांनी केला आहे. सोमवारी तानाजी सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांनी पोलिसांवर आरोप केले.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.