AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे गुंडाविरोधी पथकाची जोरदार कामगिरी, गुन्हेगारांच्या कशा आवळल्या मुसक्या?

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुंडाविरोधी पथकाने जोरदार कामगिरी केली आहे. विशेष मोहिम राबवून अनेक गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे.

पुणे गुंडाविरोधी पथकाची जोरदार कामगिरी, गुन्हेगारांच्या कशा आवळल्या मुसक्या?
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 10:48 AM

पुणे : पुणे शहरात व परिसरात कोयता गँगने (koyta gang) धुमाकूळ घातला आहे. गुन्हेगारी मोडण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर (Crime News) कारवाई केली असली तरी गुन्हे कमी होत नाही. कोयता गँगवर मकोका लावणे, कोंबिंग ऑपरेशन राबवणे, दहशतवाद्यांची यादी करणे अशी कामे पोलीस करत आहेत. परंतु त्यानंतरही गुन्हेगारी कमी होत नाही. आता पुणे परिसरातील पिंपरी चिंचवडमध्ये पोलिसांनी जोरदार मोहीम राबवली. या कारवाईमुळे अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत.

पिंपरी चिंचवडमध्ये कारवाई

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुंडाविरोधी पथकाने जोरदार कामगिरी केली आहे. विशेष मोहिम राबवून अनेक गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. या पथकाने 48 पिस्तुल जप्त केले आहे. तसेच 205 कोयते व अन्य धारधार शस्त्र अशी एकूण 253 घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या 36 आरोपींवर तर घातक शस्त्रे वापरणाऱ्या 150 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.पोलीस आयुक्तालयातील विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

पुण्यात कोयत्या गँगच्या धुमाकूळ रोखण्यासाठी पोलिसांनी मास्टर प्लॅन तयार केला. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलीस दलातील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकार्‍यांची नियुक्त या गँगला रोखण्यासाठी केली. विविध मोहीम राबवून कारवाई केली जात आहे.

कोयता गँगची दहशत

पुण्यात सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, वारजे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कोयता गँगकडून दहशत माजवली होती. आता पुन्हा एकदा पुण्यातल्या भवानी पेठेत असणाऱ्या एका हॉटेलच्या बाहेर कोयता गँगने दहशत माजवत तोडफोड केली होती.

अजित पवार, सुप्रिया सुळेंकडून प्रश्न

गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरातील गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनीही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू.