प्रसिद्ध कवी ना.धों. महानोर यांचं निधन

Namdev Dhondo Mahanor Passed Away : प्रसिद्ध कवी ना.धों. महानोर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्या वर्षी कवी महानोर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

प्रसिद्ध कवी ना.धों. महानोर यांचं निधन
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 10:30 AM

पुणे | 03 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध कवी, गीतकार ना.धों. महानोर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81 व्या वर्षी कवी ना. धों महानोर यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर मागच्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. उपचारांदरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे. ना. धों. महानोर यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. ग्रामीण जीवन शब्दबद्ध करणारा, गावगाड्यातील गोष्टी सोप्या शब्दात मांडणारा संवेदशील माणूस हरपल्याची भावना साहित्य विश्वातून व्यक्त होत आहे.

नामदेव धोंडो महानोर हे ना.धों. महानोर यांचं संपूर्ण नाव. ते मूळचे छत्रपती संभाजीनगरमधील. कन्नड तालुक्यातील पळसखेडा 16 सप्टेंबर 1942 गावात त्यांचा जन्म झाला. पळसखेडा, पिंपळगाव, शेंदुर्णी इथं त्यांनी शालेय शिक्षण घेतलं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुढे ते जळगावला गेले. पहिलं वर्ष संपताच त्यांना पुन्हा गाव खुणावू लागला. त्यांनी शालेय शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला अन् पुन्हा गाव गाठला. पण तिथे त्यांना जीवनाचा सूर गवसला. नजरेला दिसणारा निसर्ग त्यांनी शब्दात मांडला अन् महाराष्ट्राला मिळाला ‘रानकवी’!

ना.धों. महानोर यांचा लेखनी जेव्हा चालायची तेव्हा निसर्ग कागदावर रेखाटला जायचा. म्हणूनच साहित्य विश्वाने त्यांना रानकवी ही उपाधी दिली. ना.धों. यांच्या लिखाणावर बालकवींच्या साहित्याचा प्रभाव जाणवतो.

ना.धों. महानोर यांची साहित्यसंपदा

अजिंठा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता, हे कविता संग्रह म्हणजे ना. धों. महानोर यांच्या कवी मनातील भावभावनांचं तरल चित्रण.

रपसप, गावातल्या गोष्टी हे त्यांचे कथा संग्रह लोकप्रिय ठरले. ना. धों. यांचा शेतीची विशेष आवड होती. कापूस खोडवा आणि शेती, आत्मनाश व संजीवन ही शेतीविषयक पुस्तकं साहित्य प्रेमीसाठी पर्वणी ठरतात.

नो. धों. यांनी सिनेमांसाठी गीतलेखनही केलं. अबोली, एक होता विदूषक, जैत रे जैत, दूरच्या रानात केळीच्या बनात, दोघी, मुक्ता, सर्जा, मालक, ऊरुस अजिंठा, यशवंतराव चव्हाण या सिनेमांसाठी त्यांनी गीतलेखन केलं आहे.

ना. धों. महानोर यांनी राजकारणातही सक्रीय होते. 1978 साली महानोर हे विधान परिषदेचे आमदार होते.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि ना. धों महानोर यांचेही जवळचे संबंध होते. त्यावरच त्यांनी यशवंतराव आणि मी हे पुस्तक लिहिलं. तर शरद पवारांसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर शरद पवार आणि मी हे पुस्तक लिहिलं.

1991 साली पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळाला. महाराष्ट्र शासनाच्या कृषीभूषण पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं. पानझड या त्यांच्या पुस्तकाला साहित्य आकादमी पुरस्कारही प्राप्त झाला आहे. मराठवाडा भूषण या पुरस्कारानेही त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.