AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा, १५ एजंट अन् २७०० बनावट प्रमाणपत्रे, कसा चालवला तीन वर्षे उद्योग

fake SSC certificates of Maharashtra : दहावी, बारावीचे बनावट प्रमाणपत्र देणारी टोळी उघडकीस आली आहे. टीईटी घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा हा झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा, १५ एजंट अन् २७०० बनावट प्रमाणपत्रे, कसा चालवला तीन वर्षे उद्योग
fake certificate
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 2:16 PM

पुणे : राज्यात टीईटी घोटाळ्याचे (TET Scam) प्रकरण अजूनही संपलेले नाही. या टीईटी घोटाळ्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडून दिली होती. या प्रकरणात अनेक शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे (Bogus Certificate) सादर करत ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दावा करत नोकरी मिळवली होती. या प्रकरणानंतर आता दहावी, बारावीचे बनावट प्रमाणपत्र देण्याचा प्रकार उघड झाला आहे. एक एबीए झालेल्या व्यक्तीने तीन वर्षांपासून फसवणूक सुरु केली होती. तीन वर्षांपासून दहावी, बारावीचे बनावट प्रमाणपत्र तो देत होतो, परंतु त्याची माहिती यंत्रणेला मिळाली नाही.

१५ एजंटांची नियुक्ती

एमबीए झालेला सैय्यद इम्रान सैय्यद इब्राहीम याने बनावट वेबसाइट तयार करुन फसवणूक केली आहे. त्याने राज्यभरात बनावट प्रमाणपत्रे देण्यासाठी एजंटची साखळी तयार केली. दहावी, बारावी नापास विद्यार्थ्यांना हे एजंट शोधून त्यांच्यांकडून मिळेल तसा पैसा घेऊन बनावट प्रमाणपत्रे देत होते. या प्रकरणी पोलिसांनी एजंट संदीप कांबळे याला पकडल्यानंतर कृष्णा सोनाजी गिरी, अल्ताफ शेख व सय्यद इम्रान या तिघांनाही अटक केली.

हे सुद्धा वाचा

आतापर्यंत दिली २७०० प्रमाणपत्रे

महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल नावाची वेबसाइट २०१९ मध्ये केली होती. सुरुवातीला ३५ जणांना प्रमाणपत्र दिले. आता ही संख्या २७००वर गेली आहे. दहावीच्या बोर्डाचे सर्टिफिकेट बरोबर मार्कशीट आणि स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेट तो देत होता. बारावी, आयटीआय झाल्याचे प्रमाणपत्र तो देत होता.

कशी आली आयडिया

मास्टर माइंड असलेला सय्यद हा एमबीए झाला आहे. त्याने यू-ट्यूवर पाहून फसवणुकीचा फंडा तयार केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यासाठी ए १ हिंद युनिव्हर्सिटी आणि महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल या दोन फेक वेबासाइट केल्या. हा घोटाळा खूप मोठा आहे. त्याच्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कसा उघड झाला प्रकार

दहावी, बारावीत नापास झालेल्यांना बनावट प्रमाणपत्र दिले जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करुन संदीप कांबळे यांच्याशी संपर्क साधला. त्याने ६० हजार रुपयांमध्ये प्रमाणपत्र मिळेल, असे सांगितले. बनावट ग्राहकाने काही रक्कम त्याला दिली व उर्वरित रक्कम घेण्यासाठी आला असताना पोलिसांनी सापळा रचून पकडले.

'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर
14 कट्टर दहशतवाद्यांची फोटोसह यादी जाहीर.
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू
भारत - पाकमधला तणाव वाढला; सीमेवर नागरिकांकडून बंकरची साफसफाई सुरू.
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया
'मी पाकिस्तानची...', भारत सोडण्यावर सीमा हैदरची मोठी प्रतिक्रिया.
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार;अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?.
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन
पाकिस्तानला एकटं पडण्याची जोरदार तयारी; मोदींनी कोणाकोणाला केले फोन.
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.