शिक्षणाचं माहेरघर गुन्हेगारांचं घर होतंय का? पुणे शहरातील गुन्हेगारांचे आकडे वाचून बसेल धक्का

पुणे पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन व इतर मार्गाने हजारो गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. आता पुढचे पाऊल टाकत पुणे पोलिसांनी २० हजार गुन्हेगारांची यादी तयार केली आहे.

शिक्षणाचं माहेरघर गुन्हेगारांचं घर होतंय का? पुणे शहरातील गुन्हेगारांचे आकडे वाचून बसेल धक्का
पुणे पोलीस
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 10:04 AM

पुणे : कोयता गँगची (koyata gang) पुणे शहरात वाढलेल्या दहशतीमुळे पुणे पोलीस (Pune Police)आक्रमक झाले आहेत. कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी धडका सुरु केला आहे. कोम्बिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करुन पोलीस जबर कारवाई करत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे पोलीस गुन्हेगारी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. कोम्बिंग ऑपरेशन व इतर मार्गाने हजारो गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे. आता पुढचे पाऊल टाकत पुणे पोलिसांनी २० हजार गुन्हेगारांची (20 thousand criminal)यादी तयार केली आहे.

पुणे शहरातील सराईत गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन आणि मकोकाचा वापर पोलीस करत आहेत. गेल्या दोन आठवड्यात दोन कोम्बिंग ऑपरेशन केले. तिसरे कोम्बिंग ऑपरेशन १९ व २० जानेवारी रोजी राबवले गेले आहे. या ऑपरेशनमध्ये पोलिसांनी रेकॉर्डवरील तीन हजार ६८३ गुन्हेगारांची तपासणी केली. त्यापैकी ७०९ गुन्हेगार त्यांच्या वास्तव्यास दिसून आले. त्यापैकी गंभीर गुन्ह्यातील ३४ जणांना बेकायदा अटक केली. त्यात आठ तडीपार गुन्हेगारांचा समावेश आहे.

आता पोलिसांचे मोठे पाऊल

हे सुद्धा वाचा

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी २० हजार गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. त्यानुसार प्रत्येक गुन्हेगाराची संपूर्ण माहिती संकलित करण्याचे काम सुरु केले. त्यात विनयभंग, सायबर क्राईम, चोरीचे प्रकरणं, बलात्कार, घरफोड्या या सगळ्या घटनेतील गुन्हेगारांचा समावेश केला जात आहे. पोलिसांकडून जुगार, सट्टा, हुक्का पार्लरवर कारवाई केली जात आहे.

पुणे शहरातील गुन्हे वाढले

पुणे शहरातील गुन्हे वाढले आहेत. यामुळे विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रश्न उपस्थित केला होता. मागील काही दिवसांपासून किरकोळ वादातून हाणामारीच्या आणि लुटमारीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. पुणे परिसरात गुन्हेगारांची धुमाकूळ घातला आहे. पूर्ववैमस्यातून हाणामारीच्या संख्येतही वाढ झाली आहे. या घटनांनी पुणेकर त्रस्त असल्याचं चित्र आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.