पुण्यात कोरोना नियमांचे ऐशीतैशी, रात्री उशिरापर्यंत पब सुरुच, अनेक तरुण-तरुणींवर गुन्हा दाखल

जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हडपसर परिसरातील महंमदवाडीतील पब 24 वर पोलिसांनी (pune police) कारवाई केली आहे.

पुण्यात कोरोना नियमांचे ऐशीतैशी, रात्री उशिरापर्यंत पब सुरुच, अनेक तरुण-तरुणींवर गुन्हा दाखल
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 7:39 AM

पुणे : जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हडपसर परिसरातील महंमदवाडीतील पब 24 वर पोलिसांनी (pune police) कारवाई केली. या कारवाईत एकूण 104 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध लागू आहेत. पुण्यात उपाहरगृहे, मद्यालये रात्री 11 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा आहे. मात्र, हडपसर परिसरात रात्री उशिरापर्यंत पब सुरु असल्यामुळे तसेच कोरोना प्रतिबंधक नियम न पाळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. (Pune police registered case against pub and 104 youngsters for breaking the corona rule)

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. पुण्यात तर कोरोना रुग्णांचा आलेख वर जाताना दिसतोय. त्यामळे येथील प्रशासनाने खबरदारी म्हणून अनेक निर्बंध लागू केले आहेत. असे असूनसुद्धा पुणे शहरात नागरिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. हडपसर परिसरातही असाच एक प्रकार घडला. हडपसर परिसरातील महंमदवाडीतील पब 24 हा रात्री उशिरापर्यंत सुरु होता. नियमानुसार उपाहरगृहे, मद्यालये, पब आदी रात्री 11 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र पब 24 ने नियमांचे उल्लंघन केले. यावेळी या पबमध्ये मोठ्या प्रमाणात युवक आणि युवतींनी गर्दी केली होती. या तरुणांकडून सोशल डिस्टन्सिंगचेही पालन केले जात नव्हते. त्यामुळे या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी या पबवर कारवाई केली. तसेच, यातील 104 तरुण आणि तरुणींवर गुन्हा दाखल केला.

पुण्यात कोणत्या उपायोजना?

पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. तसेच, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुण्यातील कोरोनावर जातीने लक्ष ठेवून आहेत. ते येथील आरोग्य तसेच जिल्हा प्रशासनाच्या बैठका घेत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पिंपरी चिंचवड शहरात संचारबंदीची घोषणा केली आहे. येथे रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी असणार आहे.

शाळा, कॉलेज बंदच

दरम्यान, पुणे महानगरपालिका हद्दीत कोरोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग 14 मार्च 2021 पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी 28 फेब्रुवारी रोजी दिली. शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असले तरी या काळात ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल.

इतर बातम्या :

पिंपरी चिंचवडमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद

कोरोनामुळे पिफ चित्रपट महोत्सव लांबणीवर, आता ‘या’ तारखेला दमदार चित्रपटांची मेजवानी

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.