AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात MPSC आंदोलकांची धरपकड, विद्यार्थी जीव तोडून सांगू लागला, ‘तीन दिवसांपासून पाणी घेतलं नाही’

पुणे पोलिसांनी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या एमपीएससी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पूर्ण केल्यानंतरही त्यांनी आंदोलन मागे घेतलं नाही. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. तर आंदोलकांनी इतर मागण्यांसाठी आपलं आंदोलन सुरु ठेवलं होतं, अशी माहिती समोर येत आहे.

पुण्यात MPSC आंदोलकांची धरपकड, विद्यार्थी जीव तोडून सांगू लागला, 'तीन दिवसांपासून पाणी घेतलं नाही'
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 5:12 PM

एमपीएससी आंदोलकांची पुणे पोलिसांकडून अखेर धरपकड करण्यात आली आहे. पुण्यातील शास्त्री रोडवर एमपीएससी विद्यार्थ्यांचं विविध मागण्यासाठी आंदोलन सुरु होतं. त्यांच्या या आंदोलनात आमदार रोहित पवार हे देखील सहभागी झाले होते. यानंतर सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. तरीदेखील आंदोलक आपल्या इतर मागण्यांसाठी आंदोलनावर ठाम होते. दुसरीकडे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मान्य केल्यानंतर पुणे पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी दाखल होत आंदोलकांची धरपकड केली. यावेळी आंदोलकांनी पोलिसांच्या या कारवाईला विरोध केला.

पुणे पोलिससांकडून धरपकड सुरु असताना एका आंदोलकाने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आंदोलक बेंबीच्या देठापासून पोलिसांचा प्रतिकार करत बोलत होता. “आमचं शांततेचं आंदोलन होतं. तीन दिवस झाले आम्ही पाणी सुद्धा पिलं नाही. आमच्या मागण्या रास्त आहेत. आम्ही शांतपणे उपोषण करतोय. आमच्या लाखो विद्यार्थ्यांच्या या मागण्या आहेत. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या मागण्या मांडतोय”, असं आंदोलक म्हणाला.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांनी आंदोलकांची भेट घेतली होती. सरकारने आंदोलकांची मागणी मान्य केली नाही तर मी स्वत: या आंदोलनात सहभागी होणार, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी दिला होता.

पुणे पोलिसांची प्रतिक्रिया

पुणे पोलिसांनी कारवाईदरम्यान माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “त्यांची मागणी शासनाकडून मान्य करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी उपोषण सोडलं. उपोषण सोडल्यानंतर तिथे वारंवार मुलं बसत आहेत. तीन दिवसांपासून वाहतूक बंद आहे. आम्ही त्यांना वारंवार विनंती केली आहे. आमच्याकडे आता पर्याय नाही. आम्ही त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना आम्ही आता पोलीस ठाण्याला घेऊन जात आहोत”, अशी प्रतिक्रिया कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने दिली.

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.