ग्रामीण भागात बैलगाडीचा ट्रेंड वाढला, लग्नाला वऱ्हाड हॉलवरती बैलगाडीनं पोहोचलं
ग्रामीण भागात बैलगाडीचा ट्रेंड वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे, लोकं आता लग्नासाठी सजवलेली कार घेऊन न जाता, बैलगाडी घेऊन जात असल्याचं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाहायला मिळालं आहे.
विनय जगताप, पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर (PUNE PURANDAR) तालुक्यातील निळुंज गावातीलं लग्न सध्या सगळीकडं चर्चेचा विषय ठरला आहे. कारण नववधू आणि वरांनी लग्नासाठी हॉल बुक केला. सगळं काही पाहिजे तसं केलं आणि बैलगाडीतून (Wendding bullock cart) हॉलमध्ये प्रवेश केला. याची पुरंदर तालुक्यात सगळीकडं चर्चा सुरु आहे. सात ते आठ बैलगाड्या होत्या. सजवलेल्या बैलगाड्यांमधून वऱ्हाड सुध्दा हॉलवरती पोहोचलं आहे. हे सगळं पाहायला तिथं मोठी गर्दी झाली होती. काही लोकांनी हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये शूट केला आहे. सोशल मीडियावर (viral news in marathi) या लग्नाचे काही व्हिडीओ सुध्दा व्हायरल झाले आहेत. नववधू आणि वर हे दोघेही शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांनी बैलगाडीतून हॉलवरती जाण्याचा निर्णय घेतला. लग्नाचा पैपाहुण्यांची मोठी गर्दी झाली होती.
हॉलमध्ये शेतकऱ्यांमध्ये चर्चा होती
सजविलेल्या बैलगाडीचा नववधू आणि वराने कासरा हातात घेऊन हॉलवरती प्रवेश केला. नवरीला घेऊन नवऱ्याची बैलगाडीतून इंट्री चर्चेची ठरली आहे. सजवलेली कार किंवा इतर वाहनानी न जाता बैलगाडीतून जाण्याचा घेतलेला निर्णय लोकांना अधिक आवडला आहे. बदलत्या काळात लुप्त झालेल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याची हॉलमध्ये शेतकऱ्यांमध्ये चर्चा होती. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील निळुंज गावातील आकाश बनकर आणि मेघा चौरे अशी नवरा नवरीचं नावं आहे. बनकर आणि चौरे हे शेतकरी कुटुंब परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे. ग्रामीण भागातं बैलगाडीचा ट्रेंड वाढला आहे.
बैलाचं महत्त्व या नव दांपत्याने पटवून दिलंय
सजविलेल्या बैलगाडीतून कासरा हातात घेऊन, बैलगाडीचे महत्त्व पुन्हा एकदा सगळ्यांना दाखवत. वऱ्हाडासह वधूला घेऊन शेतकरी वर लग्न स्थळी पोहचला. सजवलेली कार किंवा इतर वाहनाने जाण्यास त्याने नकार दिला होता. बदलत्या काळात लुप्त झालेल्या जुन्या आठवणींना त्यामुळे उजाळा मिळाला आहे. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील निळुंज गावातील वर आकाश बनकर आणि वधू मेघा चौरे बैलगाडीतून लग्नमंडपात पोहचले. यावेळी पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून जात, शेतकऱ्यांच्या जीवनात असलेलं बैलाच महत्त्व या नवदांपत्याने पटवून दिलंय. त्यामुळं बनकर आणि चौरे हे शेतकरी कुटुंब परिसरात कौतुकाचा विषय ठरतायत. ग्रामीण भागातं बैलगाडीचा वाढता ट्रेंड पहायला मिळतोय, लग्नाला जाण्यासाठी वऱ्हाड्यांची बैलगाडीला पसंती पहायला मिळत आहे.