Pune Railway | पुणेकरांनो, प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा, अनेक रेल्वे रद्द, वेळाही बदलल्या
Pune Railway | पुणे शहरातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे प्रवास करण्यापूर्वी अपडेट टाईम टेबल पाहूनच जावे लागणार आहे. रेल्वे विभागातील अनेक गाड्या रद्द केल्या आहेत तर काहींच्या वेळा बदलल्या आहेत.

पुणे | 2 ऑक्टोंबर 2023 : पुणे शहरातून रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुण्यातून देशभरात रेल्वे जातात. आता या प्रवाशांना प्रवासाला जाण्यापूर्वी अपडेट टाईम टेबल बघावे लागणार आहे. पुणे रेल्वेने काही गाड्या रद्द केल्या आहे तर काही गाड्यांची वेळ बदलली आहे. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. प्रवाशांची एका दिवसांसाठी ही गैरसोय होणार आहे. परंतु त्यानंतर सर्व गाड्या नियमित होणार आहे. पुणे-दौंड रेल्वे मार्गावरील पाटस स्थानकावर ब्लॉक घेऊन विविध तांत्रिक कामे करण्यात येणार असल्यामुळे हा बदल करण्यात येणार आहे.
मंगळवारी धावणाऱ्या काही गाड्या रद्द
पुणे-दौंड रेल्वे मार्गावरील पाटस स्थानकावर ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे ३ ऑक्टोबर, मंगळवारी धावणाऱ्या काही गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. रेल्वे विभागाने या कामामुळे काही गाड्यांचे मार्ग बदलले आहे. तसेच त्याची थांबेही बदलली आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
कोणत्या गाड्या केल्या रद्द
- पुणे -सोलापूर -पुणे एक्स्प्रेस
- पुणे- बारामती पैसेंजर
- पुणे – दौंड पैसेंजर
- बारामती – दौंड पैसेंजर
- दौंड -पुणे पैसेंजर
- दौंड- हडपसर पैसेंजर
इंदूर-दौंड एक्स्प्रेस फक्त पुण्यापर्यंतच
रेल्वे विभागाने काही गाड्या सुटण्याची तसेच पोहोचण्याची ठिकाणे ही बदलली आहे. त्यामुळे २ ऑक्टोबर रोजी इंदूरहून सुटणारी इंदूर-दौंड एक्स्प्रेस ही गाडी पुणे रेल्वे स्थानकापर्यंत धावणार आहे. ती गाडी ३ ऑक्टोंबरला पुणे स्टेशनवर पोहचते. तसेच ३ ऑक्टोबर रोजी दौंडवरून सुटणारी दौंड- इंदूर एक्स्प्रेस ही गाडी दौंड ऐवजी पुणे रेल्वे स्थानकावरुन सुटणार आहे.




या गाडीसाठी केला बदल
हैदराबादवरुन सुटणारी हैदराबाद- हडपसर एक्स्प्रेस ही गाडी २ ऑक्टोबर रोजी दौंडपर्यंत धावणार आहे. तसेच ३ ऑक्टोबर रोजी हडपसर रेल्वे स्थानकावरून सुटणारी हडपसर- हैदराबाद एक्स्प्रेस ही गाडी दौंडवरुन सुटणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. सध्या पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्मची लांबी वाढवण्याचे कामही रेल्वे प्रशासनाने सुरु केले आहे.