Pune railway station : जिलेटिनच्या कांड्या नसून फटाक्यांच्या रिकाम्या पुंग्या; पुणे लोहमार्ग पोलिसांची माहिती, निश्चिंत प्रवास करण्याचंही आवाहन

पुणे रेल्वे स्थानकात सकाळी साडे दहाच्या सुमारास बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर तातडीनं पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर एक आणि दोन रिकामा करण्यात आला होता.

Pune railway station : जिलेटिनच्या कांड्या नसून फटाक्यांच्या रिकाम्या पुंग्या; पुणे लोहमार्ग पोलिसांची माहिती, निश्चिंत प्रवास करण्याचंही आवाहन
पुणे रेल्वे स्थानक परिसरातील बॉम्बसदृश्य वस्तूसंबंधी माहिती देताना पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 4:03 PM

पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात बॉम्बसदृश्य वस्तू किंवा जिलेटिनच्या कांड्या (Gelatin sticks) सापडल्या आहेत, अशाप्रकारचे वृत्त हे पूर्णपणे चुकीचे आहे, अशी माहिती पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील (Sadanand Vaise Patil) यांनी दिली आहे. आज सकाळी याठिकाणी बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे. फटाक्यांच्या रिकाम्या पुंग्या आणि फटाक्यांचे काही प्रमाणात स्फोटके आढळून आली आहेत. तरी नागरिकांनी कुठल्याही अफवांना घाबरू नये, असे रेल्वे पोलिसांचे (Railway Police) आवाहन असल्याचे ते म्हणाले आहेत. जिलेटिनच्या कांड्या सापडल्या नसून जे काही फटाक्यांचे लेबल सापडले आहेत, ते बी. जे. मेडिकल कॉलेजमार्फत नष्टही करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

सकाळी प्रवाशांची उडाली होती धावपळ

पुणे रेल्वे स्थानकात सकाळी साडे दहाच्या सुमारास बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर तातडीनं पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर एक आणि दोन रिकामा करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

अमिताभ गुप्ता यांनीही केला होता खुलासा

बॉम्ब शोधक पथक पुणे रेल्वे स्थानक परिसरात यावेळी तपासणीसाठी तैनात करण्यात आले होते. तसेच वाहतूकही थांबवण्यात आली होती. जिलेटिनच्या कांड्या सापडल्याची अफवा पसरली होती. मात्र रेल्वे पोलीस स्थानकात आढळलेली वस्तू जिलेटिन नाही, असा खुलासाही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केला होता.

‘रेल्वे स्थानक परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था’

पुणे रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षेची योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. स्कॅनर बसवलेले आहेत. सीसीटीव्ही आहेत. रेल्वे पोलीस दल आणि महाराष्ट्र पोलीस दल दोन्ही एजन्सी काम करत आहेत. त्यासोबतच विविध एजन्सीजही काम करत आहेत. त्यांचे अशा घटनांकडे लक्ष आहे. त्यामुळे कोणत्याही रेल्वे स्टेशन परिसरात कोणताही अतिरेकी हल्ला किंवा तत्सम घटना घडणार नाहीत, याची काळजी घेत आहोत. पोलीस सदैव नागरिकांच्या सोबत आहेत, अशी ग्वाही देतो, असे सदानंद वायसे पाटील म्हणाले.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.